विसर्जन काळात सेवा बजाविणाऱ्या पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांचा शिवसेनेच्या वतीने सन्मान, ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांनी मानले प्रशासनाचे आभार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- गणेश विसर्जन काळात कोणतीही असुविधा किंवा अघटित घटना घडू नये. आणि हा उत्सव शांततेत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न व्हावा यासाठी गेल्या अकरा दिवसांपासून सज्ज असलेल्या पोलीस, महापालिका प्रशासन, विद्युत विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग अशा विविध प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी विभाग प्रमुख गोरख पाटील, छावा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत तापकीर, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, चंद्रकांत गायकवाड, शंकर जाधव, राम खतीमकर, कृष्णा येळवे, राहुल भोसले, चंद्रकांत भुरे, सागर वारे, मनोज शिंदे, बाळू भावसार, कृष्णा दारकुंडे, शैलेश दळवी, महादेव बिक्कड, राजेंद्र भरणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरेश नखाते यांच्या वतीने याप्रसंगी ‘ब’ प्रभाग अधिकारी संजय लोखंडे, संजय गायकवाड, अश्फाक मुलानी, विशाल कुठे, सतीश श्रीनिवास, परशुराम शिंदे, विद्युत विभागाचे विजय जाधव, नायकु महाले, सुरक्षा विभागाचे शंकर नाडेकर, ज्ञानेश्वर पवार, वैद्यकीय विभागाचे मोहक तिलकचांदणी, विजय जाधव, अनिकेत सिंग, वाकड पोलीस स्टेशनचे अधिकारी मनीषा कुलकर्णी, प्रतीक्षा राणे, आकाश मोटे, दहिफळे साहेब, पुनम खकाळे, अग्निशामक दलाचे सुरेश गायकवाड, अभिमन्यू सिंग, सर्व प्रभाग अधिकाऱ्यांसह आरोग्य, विद्युत, अग्निशामक दल, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी आयोजकांच्या वतीने या कर्मचाऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.













