ताज्या घडामोडीपिंपरी

पवनाथडी जत्रा शहराच्या एच. ए. कंपनी मैदान या मध्यवर्ती ठिकाणी आयोजन करण्यात यावे – दिव्या सागर चरण

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पवनाथडी जत्रा शहराच्या एच. ए. कंपनी मैदान या मध्यवर्ती ठिकाणी आयोजन करण्यात यावे, अशी मागणी तक्रार निवारण समितीच्या सदस्या दिव्या सागर चरण यांनी आयुक्तांकडे  लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पवनाथडी जत्रा भरवली जाते. त्याला पिंपरी-चिंचवडमधील महिला बचत गटांचा चांगला प्रतिसाद मिळतो. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. विशेषतः खवय्ये खाद्यपदार्थांना पसंती देतात.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा दिनांक: ११ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान भरवण्याचे आयोजन केले आहे.

तथापि, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका च्या वतीने दरवर्षी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते, परंतु असे दिसून येत आहे कि महानगरपालिका प्रशासन राजकीय दबावाला बळी पडून वारंवार शहरातील सांगवी या एकाच ठिकाणी पवनाथाडी जत्रेचे आयोजन करताना दिसत आहे. तसेच सांगवी हे ठिकाण मध्यवर्ती नसल्या कारणाने नागरिक त्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करतात. मागील सर्व पवनाथडी जत्रा जास्तीत जास्त ह्या सांगवी येथील पीडब्ल्यूडी म्हणजे शहराच्या एकाच भागात झाल्या आहेत.

तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शहरातील सर्व नागरिक क्ऱ देतात त्यामुळे पालिका प्रशासनाने देखील सर्व शहराचा विचार करणे अपेक्षित आहे. शहरातील विविध भागातील महिलांना व बचत गटांना अद्याप संधी मिळाली नाही. शहरच्या इतर भागात देखील मोठ्या प्रमाणात महिलांचे बचतगट कार्यरत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी, तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शहराच्या अन्य भागात देखील पवनाथडी जत्रेचे आयोजन करणे आवश्यक आहे.

आपण कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तात्काळ सांगवी येथे होणारी पवनाथाडी रद्द करून शहरातील इतर विभागात अथवा शहराच्या एच. ए. कंपनी मैदान या मध्यवर्ती ठिकाणी आयोजन करण्यात यावे.

आपली विश्वासू,
सौ. दिव्या सागर चरण
सदस्या – तक्रार निवारण समिती (बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय महाराष्ट्र शासन)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button