लाडक्या बहिणींसाठी वुई टुगेदर फाउंडेशनचा पुढाकार

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी योजनेची जोरदार चर्चा व सगळीकडे महिलांची धावाधाव सुरु आहे अनेक महिलांना या योजनेचे फॉर्म भरण्यास अडचणी येत आहेत त्यात बऱ्याच महिला अशिक्षित आहेत त्यांना तर पूर्ण फॉर्म दुसऱ्याकडून भरून घ्यावा लागतो त्यामुळे बऱ्याच लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहू शकतात.
वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सर्व बाबी लक्षात आल्यानंतर त्वरित सर्व पदाधिकारी व सदस्य या योजनेतील लाभार्थी महिलांच्या मदतीसाठी पुढे आले. चिंचवड येथील ऑफिस मध्ये या योजनेचा पदाधिकारी व सदस्य मिळून लाभार्थी महिलांचे पूर्ण फॉर्म भरून त्वरित ऑन लाईन आप लोड करून घेतले जातात.आतापर्यंत 265 फॉर्म भरून घेऊन आपलोड करून घेतले आहेत.बऱ्याच लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यावर पैसे येणे सुरु झाले आहे.
सामाजिक बांधिलिकी म्हणून वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सल्लागार मधुकर बच्चे अध्यक्ष सलीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाने सदस्या मंगला डोळे – सपकाळे,सीताताई केंद्रे,सोनाली मान्हस, जयंत कुलकर्णी,दिलीप चक्रे,रवींद्र काळे,अनिल पोरे,दारासिह मन्हास,दिलीप मांडके,श्रीनिवास जोशी,झाकीर सय्यद,दिलीप पेटकर व सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या मदतीने रोज
या पुढेही या योजनेचे फॉर्म भरून घेणे सुरु राहील जास्तीत जास्त लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच वूई टुगेदर फाउंडेशन आपणास कायम सहकार्य करिन असे फाउंडेशनच्या वतीने आवाहन करीत आहोत.














