राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्यावतीने महायुती सरकारचा निषेध आंदोलन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र तील भ्रष्टाचाराची कीड आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांपर्यंत जाऊन पोहोचली. या बाबीचा तीव्र निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात पार पडले. यावेळी शरद चंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भ्रष्टाचार ग्रस्त महायुती सरकारने जसं महाराष्ट्राला पोखरून काढलं याचीच प्रचिती ही सोमवारी दुपारी अचानक मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील 28 फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. नटबोल्ट खराब असल्याने हा पुतळा कोसळला असल्याचे पुढे आले. परंतु वर्षभराच्या आत हा पुतळा कोसळल्याने एका प्रकारे सरकारने शिवाजी महाराजांची विटंबना केल्या असल्याचेच दिसते. या घटने संदर्भात सध्या तरी कंत्राटदार जयदीप आपटे स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर जरी गुन्हा दाखल झाला असला तरी, महायुती सरकारने हे टेंडर देताना त्यांच्या कामाचे ऑडिट करून कामाचा दर्जा गुणवत्ता तपासणी केली नसल्याचे दिसून येते. यासाठी शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
शिवाजी महाराजांचे आरमार कौशल्य तसेच त्यांच्या कामाचा गौरव म्हणून नौदल दिनाचे औचित्य साधून महायुती सरकारने मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पंधरा फूट उंचीचा चबुतरा आणि 28 फूट शिवाजी महाराज पुतळा अशी रचना करून दिमाखात सोहळा आयोजित केला होता. पर्यटकांसाठी हा पुतळा आकर्षणाचे आणि अभिमानाची बाब बनला होता. हा पुतळा वर्षभराच्या आतच पडल्याने भ्रष्ट सरकारचा आणखी एक भ्रष्टाचार पुढे आला आहे.
आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळल्याने तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे पुढे आले आहे. यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महायुती सरकारचा धिक्कार करत जाहीर निषेध व्यक्त करून जोरदार आंदोलन केले. हे आंदोलन शरद चंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं.
यावेळीमा.नगरसेवक अजित गव्हाणे, सुलक्षणा शिलवंत-धर, विनायक रनसुभे, गणेश भोंडवे,प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ,कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,कार्याध्यक्ष विशाल काळभोर,वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे,वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप,उपाध्यक्ष विनोद धुमाळ,माधव पाटील
मुख्य प्रवक्ता,ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव,सरचिटणीस सचिन गायकवाड,उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद,सचिव योगेश सोनवणे,संघटक राजू खंडागळे,उपाध्यक्ष अल्प संख्याक राजेश रोचिरामानी,सुशांत महादेव खुरासने,रोहित राहुल जाधव,महेश मोहन कांबळे,राहुल धनवे सचिव,अध्यक्ष मजहर शेख अल्प संख्यांक पिंपरी विधानसभा,अध्यक्ष विजय पिरंगुटे उद्योग व्यापार सेल,केतन चव्हाण,आदित्य जाधव चिंचवड विधानसभा संघटक,अनिरुद्ध चव्हाण,अरुण थोपटे,विजय बाबर,संदीप धेसाय,भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट,सतीश कुदळे,विश्रांती पाडाळे,वंदना आराख,निराशा गौडाडकर
फातिमा शेख,मनीष शेळके आदी उपस्थित होते.














