रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा – नाना काटे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अशी मागणी माजी विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर,रहाटणी येथील वरिष्ठ अभियंता यांच्याकडे केले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी-पिंपळे सौदागर हा परिसर गावठाण व सोसायटी बहुल भाग आहे. या परिसरात घरुन काम करणा-यांची संख्या जास्त असून सध्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा देखील सुरु आहेत. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील रात्री-अपरात्री नेहमीच लाईट जाण्याचा प्रमाण वाढले आहे.
उकाड्यामुळे नागरिकांचे बेहाल होत आहेत. योग्य क्षमतेने विजपुरवठा होत नसल्यामुळे व्होल्टेज कमी-जास्त झाल्यामुळे विजेवर आधारित उपकरणे ना दुरुस्त होतात. यामुळे लहानापासून थोरांपर्यंत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनीधी या नात्यांने आम्हाला त्यांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तसेस भागातील एखाद्या ठिकाणी खोद काम करताना केबल डॅमेज झाल्यास लवकरात-लवकर दखल संबंधित अधिकारी व कामगाराकडून घेतली जात नाही. ही खूप गंभीर बाब असून याची दखल घेण्यात यावी.
रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात महावितरणच्या तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण करावे व विद्युत पुरवठ्याच्या सुरु असलेला लपंडाव त्वरित थांबवावा. व जसे नागरिक नियमित विजभरणा करतात. तसे त्यांना व्यवस्थित व सुरळीत वीज पुरवठा देण्यात यावा असे ही निवेदनात म्हंटले आहे.













