ताज्या घडामोडीपिंपरी
मेट्रोच्या पुरेपूर वापरासाठी सुविधा पुरवाव्यात – सागर चिंचवडे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मेट्रोच्या पुरेपूर वापरासाठी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे सागर चिंचवडे यांनी निगडी डेपोचे उपआगार प्रमुख श्री हिंगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी मेट्रो स्टेशन परिसरात फिडर बस सेवा आणि पार्किंग साठी जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मेट्रो सेवेचा पुरेपूर फायदा घेता येईल. हीच बाब लक्षात आणून देत राष्ट्रवादीचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे यांनी निगडी डेपो येथील उपआगार प्रमुख श्री हिंगे यांना याचे निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक गणेश भोंडवे, प्रकाश धस आदी उपस्थित होते.
यावेळी हिंगे यांनी सांगितले की सूचना योग्य आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून यावर तोडगा काढला जाईल.









