मुकाई चौकातील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करा – प्रज्ञा खानोलकर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १६ मध्ये मुकाई चौक येत आहे.मुकाई चौकातील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रज्ञा खानोलकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १६ मध्ये मुकाई चौक येत आहे. सदरचा चौक
एक्सप्रेस वे लगत असलेने मुंबई कडून येणारी सर्व वाहतूक कि ज्यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये व
अहमदनगर, शिरूर, खेड, जुन्नर अशा ठिकाणी जावयाचे आहे ती सर्व वाहतूक मुकाई चौकातून होते.
मुंबई कडे जाणारी सर्व वाहतूक पिंपरी चिंचवड शहरातील व त्यालगतची हि सुद्धा मुकाई चौकातून मुंबईला जाते.
या वाहतुकीमुळे मुकाई चौकामध्ये कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होते. पाठीमागे २ किलोमीटर
इतक्या रांगा लागतात. काही वेळेस तर रुग्णवाहिकेला सुद्धा मार्ग मोकळा मिळत नाही. बऱ्याचश्या वेळा रुग्णवाहिकेमधून प्रसूतीला जाणाऱ्या महिला तसेच एक्सप्रेस वे वर होणाऱ्या अपघातामधील रुग्ण असतात. अश्या रुग्णांचे रस्ता कोंडी मुळे हाल होतात.
मुकाई चौकामध्ये एक्सप्रेस वे ला जाण्यासाठी
काही उपाययोजना करता येतील का? उदा. ग्रेडसेप्रेटर, ओव्हर ब्रिज, बायपास रोड इत्यादी. अशा
उपाययोजना केलेस वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण होणार नाही.













