महिला दिनानिमित्त डोळे तपासणी शिबीर संपन्न

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ अंतर्गत संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, पिंपरी-चिंचवड अंतर्गत भजनी मंडळ महासंघ, चिंचवड , ईशा आय केअर प्रा. लि. व विठ्ठल महादेव मंदिर यांच्या भजनी मंडळ महासंघ, चिंचवड आयोजित महिला दिना निमित्त डोळे तपासणी शिबीर संपन्न झाले.
चिंचवड मधील महिलांसाठी भजनी मंडळ महासंघाच्या माध्यमातून विठ्ठल महादेव मंदिर व ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित केले होते. यामध्ये तपासणीला सुमारे २५० भगिनी व काही बंधुंची सुद्धा तपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना पुढील काही तपासण्याची आवश्यकता होती त्यांना नेत्रालयात नेण्याची व्यवस्था ईशा नेत्रालयाने केली होती.
ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलन व भारत माता पुजनाने आणि डोळे तपासणी मशिन पुजनाने झाले. दिप प्रज्वलन नगरसेवक सुरेशजी भोईर, गणेश मिरजकर, संतोष निंबाळकर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, जेष्ठ नागरिक श्री धोंडोपंत सायकर काका व ईशा नेत्रालयाचे यशवंत बोऱ्हाडे व डॉक्टर बंधु-भगिनींनी केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ श्री अजित जगताप गुरूजींनी केले.
ईशा नेत्रालय घ्या डाॅक्टरांनी शिबीरा विषयाची व तपासणी ची माहिती दिली. माधुरी कवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
अश्विनी नाटेकर , अंजली कुलकर्णी , उज्वला कवडे , दिपाली खासनिस , शलाका कुलकर्णी ह्यांनी सहभागी होऊन अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी योगदान दिले.
ह्या कार्यक्रमाला श्री निंबाळकर, मा नगरसेवक भोईर व गणेश मिरजकर ह्याचे विशेष योगदान लाभले त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. सर्वं सहकारी व ईशा नेत्रालय यांच्यामुळे आजचा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध व सुंदर पद्धतीने संपन्न झाला.









