ताज्या घडामोडीपिंपरी

महावितरणच्या यमरूपी डीपीपासून बचावार्थ तळवडेत शुक्रवारी ‘सत्यनारायण महापूजा व महामृत्युंजय अनुष्ठान’

Spread the love

 

व्हायरल पोस्टमुळे पुन्हा एकदा भोसरी महावितरण विभाग टिकेचा धनी..

दोनशेच्या डीपीवर पाचशेचा लोड; नागरिकांची सुरक्षा रामभरोसे..

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी महावितरण विभाग टिकेचे धनी होताना दिसत आहे. नुकतेच तळवडे शाखा अभियंता निलंबन प्रकरण, त्यानंतर अधिकाऱ्यांचे कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालुन कारवाई टाळण्यासाठी निर्माण केलेला दबाव आणि आता काय तर चक्क डीपीवर दिलेल्या वाढीव लोडमुळे नागरिकांचा जिवच टांगणीला लावला आहे. विशेष म्हणजे या धोकादायक डीपीपासून शाळा ही काही अंतरावर आहे. तरीही या डीपीवर अर्थकारणासाठी अनावश्यक लोड देण्याचा गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत आग्रहाच्या निमंत्रणाची मजेशीर आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यातील उपरोधिक मजकुर महावितरणच्या विरोधातील रोष प्रकट करताना दिसत आहे.

भ्रष्ट्राचारी अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच या यमरूपी ‘डीपी’ पासुन नागरिकांच्या जिवाचे संरक्षण व्हावे, याकरिता तळवडेतील ‘ओव्हरलोड अशोक पवार डीपी क्रमांक ४६७६१०६ २०० KVA’ येथे ‘महामृत्युंजय अनुष्ठान पुजे’ला परीसरातील सर्व नागरिकांनी शुक्रवारी (दि. 31) रोजी सकाळी दहा वाजता हजर राहावे, असे आवाहन आयोजक तळवडे रहिवासी नागरिक आणि शिवसेना तळवडे शाखेचे नितीन बोंडे यांनी व्हायरल पोस्टद्वारे केले आहे. त्यामुळे नागरिक या अनोख्या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
————————

पोस्टमधील मजकुर असा….

” यमरुपी डीपीपासून संरक्षणार्थ सत्यनारायण महापूजा व महामृत्युंजय अनुष्ठान निमंत्रण !

तमाम जनतेला आमंत्रित करायला आनंद होत असून, महावितरण कृपेने खालील डीपी चे सत्यनारायण महापूजा आणि महामृत्युंजय अनुष्ठानचे आयोजन केले आहे.

‘महावितरण भ्रष्वचाराचे बाळकडू पिऊन जिवंत असलेल्या आणि चिरंजीव रहावे म्हणून, ओव्हरलोड अशोक पवार डीपी क्रमांक ४६७६१०६ २०० KVA क्षमता याच्या पासून संरक्षणार्थ महामृत्युंजय मंत्र अनुष्ठान आणि सत्यनारायण महापूजा आयोजन ‘केले आहे.

महावितरण कंपनीने २०० KVA डीपी वर वाढीव ५५४ KVA लोड देऊन नागरिकांना रामभरोसे वाऱ्यावर सोडले आहे.
त्यामुळे नागरिकांच्या जीवाचे रक्षण करायला आता महामृत्युंजय मंत्र अनुष्वन आणि सत्यनारायण पूजा घालायचे नियोजन तमाम तळवडेवासीय नागरिकांनी केले आहे. आपआपल्या निष्ठेनुसार आणि कर्मकांडाचे आयोजन करून आपला जीव कसा वाचेल याकरिता दिनांक ३१/०५/२०२४ रोजी सकाळी १०:०० वा ज्ञानदीप विद्यालय जवळील अशोक पवार डीपी येथे उपस्थित राहून या आयोजनाचा उद्देश सफल करावा, ही विनंती.

महावितरण भष्ट्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने या डीपीला चिरंजीव राहण्याचे वरदान असून त्यावर लोड देऊन नागरिक ‘मरो
का जगो’ या उक्तीला खरे करायला हे आयोजन असून, सगळ्यांनी या विनंतीलाच निमंत्रण समजून उपस्थित राहून आप आपला जीव सुरक्षित करून घ्यावा ही विनंती. आयोजक तळवडे रहिवासी नागरिक आणि शिवसेना तळवडे शाखा”….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button