महापालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -संविधानाला ७५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव साजरा करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. आपण सर्व मिळून एकजुटीने कार्य करूया आणि आपले शहर, आपला देश अधिक प्रगत, स्वच्छ आणि हरित बनविण्याचा संकल्प करूया आणि भारतीय संविधानाची मुल्ये जोपासत आपल्या देशाला अग्रेसर बनविण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते. तत्पुर्वी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
या राष्ट्रध्वजारोहण समारंभास आमदार उमा खापरे, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रविण जैन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य अभियंता प्रमोद ओभांसे, संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, देवन्ना गट्टूवार, संजय खाबडे, विजय काळे, बाबासाहेब गलबले, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, पंकज पाटील, माजी नगरसदस्य गोविंद पानसरे, नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अविनाश शिंदे, उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान प्रास्ताविकेचे वाचन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.














