ताज्या घडामोडीपिंपरी

प्रामाणिक कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात मोठी संधी- गुडधे पाटील

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक व पदाधिकारी मेळावा पार पडला.

या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तर्फे निरीक्षक ,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत मध्ये भरघोस मते घेणारे माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला.

दिवसभर चिंचवड , पिंपरी व भोसरी अशा ब्लॉक स्तरीय बैठक घेण्यात आल्या.

यामध्ये ब्लॉक अध्यक्षांनी आपल्या कार्याचा अहवाल सादर करून माहिती दिली. तसेच ब्लॉक मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते व सूचना यादरम्यान निरीक्षकांसमोर मांडल्या.

या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी सर्व पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, मा.नगरसेवक / मा.नगरसेविका, युवक, महिला, सेवादल, एनएसयुआय, इंटक, तिन्ही ब्लॉक, सर्व सेल, विभाग याचे अध्यक्ष / अध्यक्षा, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निरीक्षक गुडधे पाटील यांनी पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्याचे मत ऐकून घेतले, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक चर्चा केल्या.

त्यानंतर तिन्ही ब्लॉक मधील पदाधिकाऱ्यांचा एकत्रित मेळावा याच ठिकाणी घेण्यात आला. यामध्ये माजी नगरसेवक बाबू नायर, शहराध्यक्ष कैलास कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच या कार्यक्रमांमध्ये शहरात काँग्रेस पक्ष वाढीसाठी जे योगदान दिले, आयुष्याची चाळीस-पन्नास वर्षे ज्यांनी पक्ष संघटनेसाठी दिली अशा सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा पुणेरी पगडी , शाल, सन्मानचिन्ह, पुस्तक देऊन शहर काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या बैठकीला उत्तर देताना गुडधे पाटील यांनी पक्ष संघटनेच्या बाबतीत अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितल्या, पक्ष संघटनेत अनुभवी व हरियाणा राज्याचे निरीक्षक असलेले प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये शहर काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी विशेष सूचना दिल्या.

आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावरून ज्या पद्धतीने पक्ष संघटनेमध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं कार्य सुरू आहे त्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वच जिल्ह्यांमध्ये निरीक्षक नेमले आहेत व त्या निरीक्षकां मार्फत जिल्ह्याचा कार्याचा
आढावा घेतला जाणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज मी इथे आलो आहे,असे त्यांनी सांगितले. शहर काँग्रेसची संघटना यापुढे आणखीन मजबूत करण्यासाठी व शहर काँग्रेसला पुन्हा सोन्याचे दिवस कसे आणता येईल याबद्दल काही प्रमुख सूचना करण्यात आल्या.

पक्ष संघटन बूथ व ब्लॉक स्तरावर भक्कम करून महापालिकेत सदस्य निवडून आणण्यासाठी विशेष मोहीम राबवणार जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेसचा मतदार हा मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला पोहचण्यासाठी कार्यक्रम दिला जाईल, त्यावर प्रदेश व राष्ट्रीय स्तरावरून विशेष लक्ष असणार आहे, यापुढे जिल्हाध्यक्षांना सर्वस्व अधिकार राहणार असून त्यांच्या शिफारसी नुसारच नियुक्त्या केल्या जाणार असून तिकीट वाटप करताना देखिल जिल्हाध्यक्षांची शिफारस यास महत्व राहणार आहे आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी यापुढे पक्षशिस्त लक्षात घेऊन कुठेही पक्ष संघटनेच्या शिस्तीचा भंग होणार नाही याची काळजी घेऊनच कार्य करावे.

सर्वांनी एकत्र येऊन पक्षाला उभारी देण्याचे काम केले तर महापालिकेमध्ये चांगल्या संख्येने सदस्य निवडून येतील.

दरमहा बैठका होणार असून त्याचा अहवाल राष्ट्रीय स्तरापर्यंत जाणार आहे. त्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भविष्यात चांगली संधी आहे.

भारतीय जनता पक्ष सारख्या जातीय शक्तीच्या विरोधात लढण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे , राजकारण व समाजकारण हे एकत्रित करण्याची हीच ती वेळ आणि संधी आहे, पक्ष संघटनेचे काम करता करता देश सेवेचे मोठे कार्य करण्याची देखील संधी आहे, अशाप्रकारे गुडधे पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष यांनी मागील तीस वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने शहरांमध्ये कशाप्रकारे विविध विकासाची कामे केली काँग्रेस पक्षासाठी ज्यांनी ज्यांनी कार्य केले तर सर्वांचा उल्लेख केला आणि तसेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रत्येक कार्यकर्ता सक्षमपणे उभे राहील, महापालिकेत जनतेच्या प्रश्नांवर लढण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जोमाने काम करेल असे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिले, प्रदेश स्तरावरून प्रत्येक कार्यकर्ते दखल आपण घ्यावी व त्यांना योग्य ती संधी व न्याय द्यावा अशी विनंती निरीक्षक गुडधे पाटलांना शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.

याप्रसंगी माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, अभिमन्यू दहीतुले, बाबू नायर, विष्णुपंत नेवाळे, अशोक मोरे , गौतम आरकडे, मनोज कांबळे , श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, तानाजी काटे, रवी खन्ना, भाऊसाहेब मुगुटमल, किशोर कळसकर, अमर नाणेकर, वाहब शेख, मयूर जयस्वाल, किशोर कळसकर, मनिषा गरुड, कौस्तुभ नवले, सायली नढे, ॲड. अनिरुध्द कांबळे, मकरध्वज यादव, गौरव चौधरी, अबूबकर लांडगे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, संदेश नवले, जार्ज मॅथ्यू, शहाबुद्दीन शेख, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, प्रा.किरण खाजेकर, दाहर मुजावर, तुषार पाटील, अमरजीतसिंग पोथीवाल, , युनूस बागवान, निखिल भोईर ,सचिन कोंढरे पाटील, लक्ष्मण रूपणर, बाबासाहेब बनसोडे, निर्मला खैरे, प्रियंका कदम, भारती घाग, मुस्नफ खान, साजिद खान ,सुनीता जाधव, सुवर्णा कदम, महेश पाटील, चंद्रशेखर जाधव, वसीम शेख, प्रतीक जगताप, राहुल शिंपले, मिलिंद फडतरे, दीपक श्रीवास्तव, दीपक भंडारी ॲड. मोहन अडसूळ, हर्षद ओव्हाळ, पांडुरंग जगताप , भास्कर नारखेडे, गंगा क्षीरसागर, विशाल कसबे, सतीश भोसले, वसंत वावरे, गौतम ओव्हाळ, सचिन नेटके,आकाश शिंदे, योगेश बहिरट, युनूस बागवान, फिरोज तांबोळी, दीपक जाधव,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button