ताज्या घडामोडीपिंपरी
पीएमआरडीएच्या सदनिकांसाठी सव्वा तीन हजार अर्ज

पेठ क्रमांक बारासह ३०-३२ साठी नागरिकांकडून मिळाला अपेक्षित प्रतिसाद
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ येथील सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यास नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला असून जवळपास सव्वा तीन हजार अर्ज अनामत रकमेसह यंत्रणेकडे आले आहे.
पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएसमध्ये ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिका आहे. यासह पेठ क्रमांक ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गातील ३४७ व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी इच्छुकांकडून १५ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला असून एकूण ३ हजार २७१ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांनी दिली.
सुधारित वेळापत्रक
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिकांसाठी 3 हजार २७१ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहे. संबंधित सदनिकांच्या सोडतीची प्रारुप यादी १ जानेवारी २०२५ रोजी प्रसिदध् करण्यात येणार आहे. यावर २ जानेवारीपर्यंत आक्षेप घेता येईल.१३ जानेवारीला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करत २१ जानेवारीला ड्राय रननंतर २२ जानेवारीला अंतिम सोडत काढल्यानंतर पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येईल.









