पिंपरी येथील सिंधी बांधवांनी साजरा केला योगदिन

हिंदू सनातन धर्मामध्ये आपले शरीर,मन,हे आयुष्यभर चांगले रहावे यासाठी*योग साधना* हि अत्यंत महत्त्वाची आहे असे सांगितले आहे आणि त्या साठी १९६७ साली स्थापन झालेल्या भारतीय योग संस्थेची स्थापना करण्यात आली या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात योग साधनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे प्रयत्न आजही तसेच सुरू आहेत या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जगभरात जे योगाचे मार्गदर्शन केले जाते ते विनामूल्य केले जाते.
ज्या वेळी भारताच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्रजी मोदी संपूर्ण जगभरात भेटी देत असताना ते योग साधना संपूर्ण जगभरात अधिकाधिक जोपासली जावी या साठी प्रयत्न करीत होते आणि अखेर त्यांना २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा याला संपूर्ण जगभरातून मान्यता मिळाली आणि खरया अर्थाने सनातन धर्मामध्ये योग साधना सांगितली आहे त्यास मोठं यश मिळाले
आज दि २१ जुन २०२४ रोजी भारतीय योग साधना या संस्थेच्या पिंपरी शाखेच्या वतीने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हे योग केंद्र गेली २५ वर्षे पिंपरी येथील सिंधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या किरण रामनानी या संपूर्ण वर्षभर सकाळी दिड तास विनामूल्य चालवतात या माध्यमातून त्यांनी पिंपरी येथील डांगे चौक,पिंपळे सौदागर, हेमू कलानी उद्यान,नेहरु नगर, काळेवाडी,शनि मंदिर,अशा विविध ठिकाणी विनामूल्य योग साधना शिकविली जाते.
आज सकाळी सात वाजता पिंपरी येथील बी टि आडवाणी धर्मशाळा चया हाॅल मधे जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन प्रमुख अतिथी म्हणून हरदयाल दादा आसरानी, पुष्पा जेठवानी, भावना जमतानी, मनोहर जेठवानी,जवाहर कोटवानी यांच्या हस्ते करण्यात आले .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश वलेजा, सुरिंदर मंघवानी,पुजा मुलचंदानी,ज्योती मुलचंदानी, अरुण लोखंडे,आभारानी,दयाल तलरेजा,रविना,चेतन ओछानी, प्रदिप नचनानी,रितु,सरला ,वर्षा,आशा,इनिषा,मेघा, गट्ट महादेव, अशोक वासवानी,,तारा मॅडम,यादवभाई, गीता नोतानी,हिना, शारदा दासानी,पुजा नागपुलानी, सिताराम मोरे आणि अन्य योग साधकांनी परिश्रम घेतले यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरदयाल असरानी आणि पुष्पा जेठवानी यांनी सांगितले की रोज योग साधना केल्याने शरीरातील रक्ताभिसरण नियमित राहते,भुक व्यवस्थीत लागते माणसाला होणारे अनेक रोग शरीरा पासून दुर राहतात आणि एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीस, रक्तदाब,या सारख्या आजारावर मात करण्यासाठी रोज योग साधना केल्याने शरीर प्रकृती स्थिर राहते.
या निमित्ताने संस्थेच्या प्रमुख किरण रामनानी यांनी सांगितले की या बी टि आडवाणी धर्मशाळेत रोज ३६५ दिवस सकाळी सात वाजता योगा चे विनामूल्य मार्गदर्शन केले जाते सर्व लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.













