ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पूर्वीचे मोरवाडी येथील न्यायालय आता नेहरूनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील सुसज्ज इमारतीमध्ये स्थालांतरीत झालेले असुन आज रोजी सदर न्यायालयामध्ये पूर्वीचे ५ तर नव्याने ४ अशा एकुण ९ न्यायाधिशांची नेमणुक दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयात करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय नव्याने स्थापन झाल्यापासुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे हिंजवडी पोलिस स्टेशन, रावेत पोलिस स्टेशन, दिघी पोलिस स्टेशन, भोसरी पोलिस स्टेशन व वाकड पोलिस स्टेशनचा संपूर्ण भागाचे न्यायालयीन कामकाज पिंपरी न्यायालयात वर्ग करणेकामी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. सध्या वरिल पोलीस स्टेशनचे कामकाज हे शिवाजीनगर न्यायालयात तर काही काम खड़की न्यायालयात केले जाते.

पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी नव्याने झालेले नेहरूनगर येथील पिंपरी न्यायालय हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ते सर्वाच्याच सोईचे ठरणार आहे. यामुळे आपल्या पोलिस यंत्रणेवरील प्रवासाचा ताण कमी होत नागरिकांचा तसेच प्रशासकीय यंत्रणा यांचा वेळ व पैसे याची बचत होणार आहे.

त्यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना भेटून हिंजवडी पोलिस स्टेशन, रावेत पोलिस स्टेशन, दिघी पोलिस स्टेशन, देहुरोड पोलिस स्टेशन, भोसरी पोलिस स्टेशन, वाकड पोलिस स्टेशन (संपुर्ण भाग) या पोलिस स्टेशनचे न्यायालयीत कामकाज हे पिंपरी न्यायालयाकडे वर्ग करावे त्याचबरोबर वकिलांवर होणारे हल्ले लक्षात घेता वकील संरक्षण कायदा महाराष्ट्र राज्यात लागू करावा व मोशी येथील नियोजित न्यायालयाचे भूमिपूजन व बांधकाम कामकाज संदर्भात निवेदन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे देण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गोरक्ष लोखंडे, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या विद्यमान उपाध्यक्षा ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, ॲड. प्रसन्न लोखंडे, ॲड. शंकर पल्ले आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button