ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिशनच्यावतीने तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंग व स्वच्छता अभियान

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिशनच्यावतीने तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंग व स्वच्छता अभियान राबविण्यात आले .

नविन वर्षाच्या सुरुवातीला दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठिक 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गर्जनाने तिकोना किल्ल्यावर वकील बांधव व भगिणी यांनी ट्रेकिंग करून एक दिवस गड किल्ले संवर्धनासाठी स्वच्छता अभियान राबवून श्रमदान मोहीम यशस्वी पार पाडली.तसेच गडकिल्ल्याच्या इतिहासाबद्दल डायरी नोंद करण्यात आली.

किल्ला वरील मावळा यांनी किल्ल्याबद्दल सविस्तर माहिती दिली, तसेच सर्व वकील बांधव यांनी गडकिल्ल्यांचे स्वच्छता करून, किल्याची परिक्रमिका केली तसेच वकील वर्गाला मोठया प्रमाणात मानसिक ताण तणावाला (ट्रेसला )सामोरे जावे लागते त्यामुळे आपला निवांत वेळ घालवण्यासाठी संगीत खुर्ची चे आयोजन करण्यात आले संगीत खुर्ची बरोबर च नाटक, हास्य जत्रा, विनोद इत्यादी मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पाडून स्नेहभोजन करून परतीचा प्रवास सुरू केला.

जवळपास 70 ते 80 वकील बांधव व भगिनीनी सहभाग नोंदवला. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या प्रथम महिला अध्यक्ष ॲड. प्रमिला हरिश गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख भागवत कुंभार, सचिव ॲड. हिशोब तपासनीस ॲड. संतोषी संजय काळभोर, सदस्य ॲड. जयेश उत्तम वाकचौरे, ॲड. तेजस कालिदास चवरे, ॲड. विशाल आसाराम पौळ तसेच ॲड. बि.के.कांबळे, ॲड. नाना रसाळ, ॲड. मामा खरात, प्रतीक जगताप, कुलदीप बकाल, रोहित वाघमारे, निलेश टिळेकर, किरन सूर्यवंशी, अड साबळे ॲड. सुनील कडुसकर, ॲड. नारायण थोरात,ॲड. संगीता कुसालकर ॲड. पवन गायकवाड, ॲड.प्रशांत बचुटे, कोर्ट कर्मचारी सचिन कोळी,ॲड.प्रशांत भडकुभे, ॲड.विनोद आढाव व इतर वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button