पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सन २०२४ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते मोशी प्राधिकरण येथील पर्ल बेन्क्वेट हॉल या ठिकाणी करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष – संदीप बेलसरे, सचिव – जयंत कड, खजिनदार – संजय ववले, प्रसिद्धी प्रमुख – विजय खळदकर, मा. अध्यक्ष – सुरेशतात्या म्हेत्रे, संचालक – संजय सातव, नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, भारत नरवडे, सचिन आदक स्विकृत संचालक – संजय भोसले, सुरेश गवस, मा. योगेश लोंढे तसेच संघटनेचे सभासद उपस्थित होते.
या दिनदर्शिकेत लघुउद्योजकांना आवश्यक असणारी माहिती तसेच सर्वसामान्य व्यक्तींना लागणारी तिथी स्वरूपातील माहिती ही मराठीमध्ये ठळकपणे नमूद करण्यात आलेली आहे. या दिनदर्शिकेचे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील जवळपास सर्वच लघुउद्योजकापर्यत वितरण करण्यात येते.













