ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्यावतीने अहिंसा पुरस्कार स्वामी गोविंद देवगिरी, डॉ. श्रीपाल सबनीस आणि रघुनाथ ढोले यांना प्रदान

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे अहिंसा पुरस्कार जे शाकाहारी व्यक्तींना आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या महानुभावांना दिले जातात. यावर्षी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांना अध्यात्मिक क्षेत्रातील, ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना साहित्य क्षेत्रातील तसेच रघुनाथ ढोले यांना पर्यावरण क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्री गोविंददेव गिरी महाराज हे मोशी वेदश्री तपोवन येथील आश्रमाचे प्रमुख असून अनेक अध्यात्मिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे ते विश्वस्त आहेत राम मंदिर प्रतिष्ठापना समारंभामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. तसेच डॉ श्रीपाल सबनीस यांनी 60 पेक्षा जास्त कादंबऱ्याचे लिखाण केले असून 250 पेक्षा जास्त पुस्तकांना प्रस्तावना दिलेली आहे आणि हजारो ठिकाणी प्रवचन देऊन समाज प्रबोधनाचे काम केलेले आहे.श्री रघुनाथ ढोले यांनी पर्यावरण क्षेत्रामध्ये विशेषतः वृक्षारोपणाच्या क्षेत्रामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली असून चाळीस हजारापेक्षा जास्त वृक्षांचे वृक्षारोपण केलेले आहे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून घेतलेले आहे. हे सर्व मान्यवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड जैन महासंघाने या सर्व महानुभावांना भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड मधील प्रा रामकृष्ण मोरे सभागृहात अहिंसा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया ,स्वागताध्यक्ष किरण भाई शहा, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, कोषाध्यक्ष में नेनसुख मांडोत तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, महामंत्री संदीप फुलफगर ,उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा, संदेश गदिया ,शांतिनाथ पाटील या विरेश छाजेड, आणि माजी अध्यक्ष मोहनलाल संचेती अजित पाटील नितीन बेदमुथा ,प्रा प्रकाश कटारिया, विलास पगारिया, सूर्यकांत मुथियान, वीरेंद्र जैन ,उमेश पाटील, तसेच तुषार मुथा , अरिहन्त गिरमल ,सुरगौंड पाटील सचीन कोगनाळे, इत्यादी पदाधिकारी संयोजना साठी मंचावर हजर होते यावेळी बोलताना श्री गोविंददेव गिरी यांनी अन्यायाविरुद्ध तसेच हिंसाचाराविरुद्ध केलेली छोटीशी हिंसा ही अहिंसाच असते कारण मोठा हिंसाचार होण्यापासून सदर छोटीशी हिंसा करण्याची आवश्यकता असते भगवान भगवान महावीरांचा अनेकांतवाद हे सर्व संघर्षांना टाळण्यासाठी समर्थक उत्तर आहे असे प्रतिपादन केले डॉ श्रीपाल सबनीस यांनीही भगवान महावीरांच्या अहिंसा तत्वाचे समर्थन करीत आजच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण विश्वाला वाचवायचे असेल तर भगवान महावीरांची अहिंसाच युद्धाला टाळू शकेल.

प्रत्येकाने आपल्या मनामध्ये अहिंसेचा आणि अनेकांत वादाचा विचार आणला आणि त्याची जर आचरणात अंमलबजावणी केली तर निश्चितपणे संघर्ष टाळता येईल असे प्रतिपादन केले पर्यावरण प्रेमी रघुनाथ ढोले यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व आपल्या का भाषणात विशद केले. शेखर सिं यांनीही महासंघाच्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.प्रारंभी महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी प्रास्ताविक केले व महासंघाच्या सर्व उपक्रमांची तसेच अहिंसा सप्ताह, अहिंसा पुरस्कार भक्ती संध्या या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली यावेळी भक्ती गीत स्पर्धेमध्ये हा विजेते झालेले तीन क्रमांकाचे 1) जैन संस्कार ,चिंचवडगाव २) अहिसा ट्रस्ट निगडी ३ ) सुरस़ंगम पुणे या भक्तिमंडळांना बक्षिसाची रक्कम व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले , महासंघाच्या या सप्ताहासाठी ज्यांनी मदत केली सहयोग दिला असे किरण भाई शहा, विदेश देसरडा, देवेंद्र लुंकड, तेजस्विनी जी कांकरिया धर्मेश गांधी, नितीन, सौरभ बेदमुथा यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.आभार वरिष्ठ उपाध्यक्ष श दिलीप भनसाळी यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. सायंकाळी सात वाजल्यापासून पालीताना येथील संगीत रत्न मोहित भाई बारोट यांचा भक्ती गीतांचा अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि भावभक्तीने परिपूर्ण असा कार्यक्रम संपन्न झाला भाविकांनी या भक्ती संगीत मध्ये नृत्याच्या माध्यमातून साथ दिली आणि रात्री अकरा वाजता भक्तीगीतांच्या समारोपाने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली, अहिंसा पुरस्कार समारंभाचे सूत्रसंचालन डॉअशोककुमार पगारिया यांनी केले.तर भक्तीगीत स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा प्रकाश कटारिया यांनी केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शुभांगी पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button