पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अहिंसा सप्ताहाचा शुभारंभ कासारवाडी येथील पगारिया सभागृहातील भक्तामर पठनाने मंगलमय वातावरणात संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने अहिंसा सप्ताह साजरा केला जात आहे .आज दिनांक 15 एप्रिल रोजी या सप्ताहाची सुरुवात झाली असून कासारवाडी येथील जैन स्थानक अंतर्गत पगारिया सभागृहात भक्तामर पठण आणि प्रार्थना घेण्यात आली. याप्रसंगी साध्वी प पू करुणाश्रीजी महासतीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला. पिंपरी चिंचवड मधील सुमारे 200 भाविकांनी यात भाग घेतला .अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कासारवाडी जैन श्रावक संघ आणि पार्श्वनाथ युवक मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.
महासंघाचे अध्यक्ष उमेश पाटील यांचा संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया व संदीप फुलफगर यांनी सन्मान केला. या कार्यक्रमानंतर दहा वाजता डायग्नोपेन या डायग्नोस्टिक कंपनीच्या वतीने महिला कर्करोग चिकित्सा शिबिर दंत चिकित्सा शिबिर आणि रक्तगट तपासणी शिबिर संपन्न झाले. श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या महिला शाखेच्या वतीने सौ लता पगारिया ,सौ नितल फुलफगर,आणि सौ कीर्ती कर्नावट यांनी संयोजन केले सुमारे 73 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला .













