पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स असोसिएशनकडून दहावी – बारावीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील नेहरूनगर न्यायालयात पिंपरी चिंचवड परिसरातील वकील पाल्यांच्या दहावी – बारावीत यश संपादन केलेल्या ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उतीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कामगार कल्याण युवा मंचाचे संस्थापक ॲड.अमोल लक्ष्मण खांडेकर लाभले होते तर कार्यक्रमास प्रमुक उपस्थिती म्हणून माजी अध्यक्ष ॲड.नारायण रसाळ, ॲड.अरुण खरात, ॲड.सुनिल कडूसकर, ॲड.बी.के कांबळे, मा.उपाध्यक्ष ॲड.प्रतिक जगताप हे लाभले होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.अमोल खांडेकर यांनी “ सोशल मिडिया हे दुधारी शस्त्र आहे त्याचा वापर सांभाळून करणे कसे गरजेचे आहे ” हे सांगितले त्याचबरोबर विद्यार्थी यांनी अंगी नम्रता, आई वडिलांचे संस्कार अनि सामाजिक बांधिलकी कशी जपावी याचे देखील महत्व पटवून दिले. या कार्यक्रमात इयत्ता बारावी उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये हर्षवर्धन बवले, शाल्मली साठे, अथर्व पवार तर दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये कु.समृद्धी लांडे, वैष्णवी खर्चे, श्रेयश ढोकले,दिवेश वराडे, प्राची निनाळे, सहर्ष माने,प्रगती घोरपडे, स्मितल पाटील, नंदिनी महल्ले, महक कांबळे, हाफिज शेख, स्वप्नाली मोटे, सार्थक आव्हाड,हर्षद सारस्वत, प्रगती घोरपडे, सिया कांकरिया ई.विद्यर्थ्यांना सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या सन्मान व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला हरीश गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख भागवत कुंभार,सहसचिव ॲड.श्रीराम गालफाडे, सदस्य ॲड.तेजस चवरे, ॲड.जयेश वाघचौरे यांच्या वतीने करण्यात आले होते तर या कार्यक्रमास ॲड.जे.के काळभोर, ॲड.प्रताप साबळे, ॲड.थारा नायर आदी उपस्थित होते.













