ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरी-चिंचवडचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहराध्यक्ष रविवारी ठरणार, दिग्गज शर्यतीत

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह त्यांच्या समर्थक १५ माजी नगरसेवकांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे सर्किट हाऊस येथे बैठक दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. मेळाव्यात नवीन शहराध्यक्ष जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
काळेवाडीतील रागा पॅलेस हॉल येथे रविवारी (ता. २१) मेळावा घेऊन नवीन शहराध्यक्ष जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत सांगितले.पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदासाठी आमदार अण्णा बनसोडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, आदींच्या नावाची चर्चा आहे.













