ताज्या घडामोडीपिंपरी

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्याधर चाबुकस्वार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विद्याधर चाबुकस्वार यांचा २१ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक आर.डी. भालेराव, नोरोजी वाडिया कॉलेज चे प्रिंसिपल डॉ वसंत चाबुकस्वार,  यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मॉर्डन कॉलेज च्या प्राध्यापिका वैशाली चाबुकस्वार ,पुणे महानगर पालिकेचे अभियंता संदीप चाबुकस्वार, कुरुळी गावच्या उपसरपंच प्रतिभा ताई कांबळे, महाबोधी विहाराचे अध्यक्ष विजय जगताप , राहुल ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप जगताप, संकल्प पुष्पमाला चे सदस्य रमेश जाधव, प्रमोद गायकवाड, विलास कांबळे, बौद्धजन विकास मंडळ चे अध्यक्ष विलास पोळ, सारनाथ बुध्दविहार चे सदस्य नवनाथ मस्के , राजू भालेराव, अमित भालेराव ,  सामाजिक कार्यकर्त्या शोभा जगताप , विमल शिनगारे, सुषमा वाघमारे सामाजिक कार्यकर्ते निलेश भिसे , राजू ओव्हाळ , बाळासाहेब शेंडगे तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

“त्यांची पत्नी विठाबाई चाबुकस्वार यांची चार मुले व एक मुलगी अभ्यासात हुशार होते व त्यांच्या वडिलांनाही शिक्षणाच्या बाबतीत हलगर्जीपणा अजिबात चालत नसे. ते नेहमी काटेकोरपणे लक्ष देत असे. त्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागली. डॉ. वसंत चाबुकस्वार हे नौरोजी वाडिया कॉलेजमध्ये प्रिंसिपल आहेत. सुनबाई वैशाली चाबुकस्वार या मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. संदीप चाबुकस्वार पुणे महानगरपालिकेमध्ये ज्युनिअर इंजिनिअर आहेत तसेच अरुण चाबुकस्वार यांनी हालाखीच्या परिस्थितीत असताना एक इंग्लिश मीडियम शाळा उभी केली. प्रमोद चाबुकस्वार स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून मुलगी मुलगी प्रतिभा कांबळे या चाकण – कुरळी गावच्या उपसरपंच आहेत.हे गरीब परिस्थितीतून त्यांनी सर्व काही उभा केलं आहे भविष्यकाळात मोठी झेप घेऊन शाळेची सुसज्ज इमारत होणार असून गरीब व वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, सर्वांना शिक्षण या योजनेखाली विद्यार्थ्यांना अल्पदरात व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत” असे उदगार इंटरनॅशनल मिशन चे सदस्य राहुल भातकुले व  पि.ची.म.न.पा चे अभियंता विजय कांबळे यांनी मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मित्र मंडळाचे अध्यक्ष बौद्धचार्य  शांताराम भालेराव यांनी केले व आभार प्रदर्शन बौद्धचार्य गोरख रोकडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button