नाना काटे सोशल फाउंडेशनच्या ड्रीम्झ स्कटींग क्लब, ए.आई.एस. ड्रीम्झ व टॉपर्स स्पोर्ट्स क्लबच्या १८ खेळाडूंनी केला विश्वविक्रम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बेळगांव( कर्नाटक) येथील शिवगंगा स्केटिंग क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या १०० मीटर्स फास्टेस्ट बॅकवार्ड्स ऑन स्केट्स युझिंग टू व्हील्स ७२ आवर्स, अटेम्प्ट फॉर गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम महोत्सवात पिंपळे सौदागर पिंपरी चिंचवड येथील नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लब, ए आई एस ड्रीम्झ व टॉपर्स स्पोर्ट्स क्लबच्या १८ स्केटर्सनी भाग घेवून तो रेकॉर्ड ॲटेम्ट पूर्ण केला.
या रेकॉर्ड साठी संपूर्ण देशभरातील सुमारे तीनशे खेळाडू सहभागी झाले होते. हे सर्व स्केटर्स पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल स्केटिंग ट्रॅक पिंपळे सौदागर व वाकड ताथवडे येथील अश्विनी इंटरनॅशनल स्कूल ड्रीम्झ स्केटिंग क्लब रिंग व एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल रहाटणी स्केटिंग ट्रॅक येथे सराव करतात.
२७ मे ला खेळाडूंचे मेडिकल चेकअप करण्यात आले, २८ मे ला रेकॉर्ड ची प्रॅक्टिस करून दुपारी ३.३० ला रेकॉर्ड अटेंम्ट करण्यास सुरुवात झाली व ३१ मे ला संद्याकाळी ६.३० वाजता वर्ल्ड रेकॉर्ड अटेंम्ट पूर्ण झाल. रेकॉर्ड अटेम्प्ट चालू असताना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली तरीही मुलांनी दिवस रात्र ७२ तास स्केटिंग चालू ठेवत हा रेकॉर्ड अटेंम्ट यशस्वी पणे पूर्ण केला.
सहभागी झालेल्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे.
1.श्रीअंश विश्वकर्मा (जी. के. गुरुकुल स्कूल, पिंपले सौदागर)
2.अबीर अमित जाधव (अल्फोंसा हाय स्कूल, काळेवाडी, पिंपरी )
3.आर्ष जितेंद्र कटके (ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल, ताथवडे)
4.शौर्य निखिल पाटील (इंदिरा नॅशनल स्कूल, वाकड )
5.मुकुला अमित इंगळे ( विद्या व्हॅली स्कूल नॉर्थ पॉईंट)
6.अभिश्री संदेश भावके (
- स्वरनीम अलंकार सुर्वे
8.हेज़ल जितेंद्र निर्वाणी ( जी. के. गुरूकुल स्कूल, पिंपले सौदागर)
9.नव्या निलेश सेरीवाला ( एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल रहाटणी))
10.आध्या तुषार कुदळे. (जय हिंद हायस्कूल. पिंपरी)
11.अर्णव कृष्णराज कलघटगी (दिल्ली पब्लिक इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर)
- शोयब समीर मनेरी पाटील
- शर्विल संकेत थत्ते ( वॉलनट स्कूल,वाकड )
14.कोयल संजय गायकवाड ( आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर)
15.सना गायत्री (आर्मी पब्लिक स्कूल किरकी)
16.स्वप्नील संतोष सरवदे (आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर)
- ध्रुवराज सुभाष शिरसाठ (आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर)
18.गौरी सुनील दिघे (एस.एन.बी.पी ज्युनिअर कॉलेज रहाटणी)
यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड अटेंम्ट यशस्वीपणे पूर्ण होताच नाना काटे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल (नाना) काटे यांनी व्हिडिओ कॉल करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
वर्ल्ड रेकॉर्डमध्ये टीम मॅनेजरम्हणून शशांक कुमार, कल्याणी इंगळे, प्रगती कुदळे यांनी काम बघितले तसेच सर्व स्पर्धकांना क्लबचे कोच वैभव बिळगी, राहुल बिळगी, वंदना बिळगी, सुरज दीक्षित, राजेश शर्मा आणि प्रिनाल शर्मा, यांचे मार्गदर्शन लाभले.













