ताज्या घडामोडीपिंपरी

नवरात्री हा आदिशक्तीचा उत्सव.. नारी सन्मान ही आपली संस्कृती – शर्मिला ठाकरे

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ग. दि. माडगूळकर नाट्यगृह प्राधिकरण येथे नवरात्रीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी शर्मिला ठाकरे यांनी नवरात्री उत्सवाचे महत्व सांगितले, त्या म्हणाल्या की, नवरात्री हा आदिशक्तीचा उत्सव आहे, नारी सन्मान ही आपली संस्कृती आहे, आदिशक्ती ही सर्व विश्वाची जननी आहे. तो धागा पकडून उपासना करायची आहे ह्याची जाणीव करून दिली जाते. पावसाळा संपून अन्नधान्य पिकलेले असते, आपल्या हिंदू धर्मात सर्व उत्सव कृषी संस्कृतीशी सबंधित आहेत. अहोरात्र काम करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण महिला या उत्सवात एकत्र येऊन चैतन्य निर्माण करतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.

हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. असुरी शक्तीचा नाश करून सकारात्मक ऊर्जा शक्ती आणि कल्याणकारी जीवनासाठी सर्व स्त्रियांचा सन्मान करण्याची आपली संस्कृती आहे, त्यामुळे महाराष्ट्र नव निर्माण सेना शारदीय नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान करत आहे, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी सरचिटणीस रिटा गुप्ता, नेते राजेंद्र बाबू वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस गणेश सातपुते, शहर अध्यक्ष सचिन चिखले, महिला शहर अध्यक्ष पुणे वनिता वागस्कर, माजी नगरसेविका अश्विनी चिखले, शहर अध्यक्ष सिमा बेलापुर उपस्थित होत्या.
सन्मान नारीशक्तीचा स्त्री म्हणजे अभिमान प्रत्येक कुटुंबाची शान आदी ग्रंथामध्ये स्त्रियांचे महत्त्व लक्षात घेऊन सांगण्यात आले आहे की यत्र नार्यस्तु पुज्युन्ते रमन्ते तत्र देवता अर्थ जिथे स्त्रियांची पूजा केली जाते. तिथे देवता वास करतात महिलांना स्वयंरोजगार मिळावा स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबासाठी काम करत असताना त्यांना मदत म्हणून हा प्रयत्न पक्षाच्यावतीने करण्यात आला.

महिलांना नोव्हेल कंपनीच्या शिलाई मशीन देण्यात आल्या चांगल्या दर्जेदार या शिलाई मशीनला कंपनीतर्फे एक वर्षाचे वॉरंटी आहे. तसेच यावेळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम महिलांसाठी घेण्यात आला, या कार्यक्रमाचा महिलांनी आनंद घेतला. मनोरंजन डान्स गाणी उखाणे विविध खेळ घेऊन निवेदक अक्षय मोरे यांनी कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली. या कार्यक्रमात 1000 महिलांनी सहभाग घेतला होता. यात सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. प्रश्नमंजुषाद्वारे शंभर बक्षीसे देण्यात आली. लकी ड्रॉ द्वारे दोन पैठणी व तीन बक्षीस देण्यात आले विजेत्यांना १) मानाची पेठणी, २) सोन्याची नथ, ३) चांदीचा छल्ला असे सर्व बक्षीस शर्मिला राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले. शर्मिला वहिनींनी सर्व महिलांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या व महिलांचे संरक्षणासाठी त्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यासोबत कायमच आहे अशी त्यांच्या भाषणात नमूद केले.

रिटा गुप्ता म्हणाल्या आयोजकांनी अशाच प्रकारे चांगले काम करून महिलांचा सहभाग जास्तीत जास्त पक्षात वाढवा व महिलांना मदत व्हावी अशी कामे करा असे सांगितले. तर शर्मिला वहिनी यांनी चांगला कार्यक्रम केला म्हणून आयोजकांच्या पाठीवर शब्बासकीची थाप दिली असे समाज उपयोगी कार्यक्रम घेत चला मी नक्की येईल अशी ग्वाही वहिनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला शहराध्यक्ष सीमा बेलापूरकर, शहर सचिव रुपेश पटेकर, उपाध्यक्ष राजू सावळे, चंद्रकांत बाळा दानवले, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, उपाध्यक्ष विशाल मानकरी यांनी केले होते.

यावेळी महिला पदाधिकारी संगीता देशमुख, अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, विद्या कुलकर्णी आदिती चावरिया, दक्षता क्षीरसागर, वैशाली कोराटे, वैशाली बोत्रे, उपविभाग अध्यक्ष नाथा शिंदे, नितीन चव्हाण, भागवत नागपुरे, अलेक्स मोजेस, विनोद भंडारी, सुधीर जम, सुरेश सकट, आकाश सागरे, प्रवीण माळी, परमेश्वर चिल्लरगे, निलेश नेटके मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button