ताज्या घडामोडीपिंपरी

तब्बल 24 वर्षानंतर पुन्हा एकदा नवमहाराष्ट्र विद्यालयाचा दहावी ड चा वर्ग भरला

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडीमध्ये १९९९/२००० दहावी ड चे विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा मोठ्या उत्सहात पार पडला.. कार्यक्रमासाठी त्यावेळी चे शिक्षक श्री गायकवाड सर, श्री कांबळे सर, सौ सुर्वे मॅडम, सौ परदेसी मॅडम, उर्मिला पाटील मॅडम, श्रीमती रणपिसे मॅडम यांनी आवर्जून उपस्थिती नोंदवली शिक्षकांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दीप प्रज्वलन व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन राष्ट्रगीत प्रार्थना अगदी शाळेसारखेच घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणीनां उजळा दिला. शिक्षक ही आपल्या विद्यार्थी मनोगत ऐकताना रमले होते.पुढे शिक्षकांनी आपल्या मनोगता मध्ये आमच्या हातुन असे विद्यार्थी घडल्याचा आनंद आहे, संस्कार शिक्षण ज्ञान सक्तर्मी लागल्याची भावना व्यक्त केली.

शिक्षकांचे मार्गदर्शन व आशीर्वाद कायमच मोलाचे आहेत.. हे जिव्हाळ्याचे नाते कायम स्मरणात राहील आशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. जुन्या आठवणीत सगळेच भावनिक झाले होते. शेवटी सौ सुर्वे मॅडम यांनी पसायदान म्हनुन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रसाद कुलकर्णी सूत्र संचालन संजय पगारे आभार अशोक फुंदे यांनी मानले.. सर्वांनी एकञीत स्नेहभोजन केले.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष म्हेञे,नितिन भोसले,अमोल ठोसर,श्याम गायकवाड यांनी विशेष प्रयत्न  केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi