जैन धर्म ग्रंथ -आगम यात्रा कासारवाडी येथे संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जैन धर्म ग्रंथ -आगम यात्रा कासारवाडी येथील पार्श्वनाथ सोसायटी मधून जैन स्थानक- पगारिया सभागृहा पर्यंत शानदार मंगलमय वातावरणात संपन्न झाली.
कासारवाडी पुणे येथील जैन स्थानकामध्ये प पू मंगल प्रभाजी म सा, डॉ मधुस्मिताजी म सा, प पू हर्षिताजी म सा आणि प पू दिव्यांशीश्रीजी म सा यांच्या मंगलमय सानिध्यात जैन धर्म ग्रंथ 32 आगम 32 परिवारांकडे देऊन त्या धर्मग्रंथांची ग्रंथ दिंडी अर्थात आगम यात्रा पार्श्वनाथ सोसायटीतील श्री वसंतलालजी बोरा यांच्या बंगला नंबर २४(४) पासून जैन धर्मस्थानक – पगारिया सभागृहामध्ये मंगलमय वातावरणात काढण्यात आली. या ठिकाणी सर्व ग्रंथांचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले .
कासारवाडी संघाचे अध्यक्ष श्रेयस कुमार पगारिया, माजी अध्यक्ष संदीप फुलफगर, महामंत्री पंकज कांकरिया, कोषाध्यक्ष संदीप कर्नावट तसेच इतर सर्व पदाधिकारी यांनी या आगम यात्रेचे सुंदर आयोजन केले. महासतीजींचे जैन धर्मशास्त्रावर प्रवचन झाले आणि मंगल पाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.या आगमयात्रेमध्ये भाविक सहभागी झाले . या ग्रंथ सजावटीमध्ये सर्व परिवारा़ंनी ग्रंथांची सु़ंदर सजावट केली होती .













