चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

चिंचवड मतदारसंघातील विजेच्या प्रश्नासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष  शंकर जगताप यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळा सुरू झाला तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वच भागात वीज यंत्रणेच्या अनेक समस्यांसासाठी अद्याप उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आज चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महावितरणच्या पिंपरी विभाग कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकड़ून चिंचवड विधानसभा मतदारसंघात काय-काय खबरदारी घेण्यात आली आहे, यावर सर्वांनी चर्चा करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

मतदारसंघात जागोजागी असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल बदलणे, गंज चढलेले डीपी बॉक्स बदलणे, सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असून, तो पूर्ववत कधी होणार याचा एसएमएस अलर्ट वीज ग्राहकांना पाठविणे, प्रभाग क्रमांक १७ मधील ३५० घरांसाठी महत्त्वाचा असलेले एचटी लाईन बदलणे, तसेच एखाद्या ठिकाणी विद्युतीकरणाचे काम करण्यात येणार असल्यास त्याबाबतही वीज ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती देणे आदी विषय व नागरिकांना भेडसावत असलेल्या वीजेच्या इतर समस्या तातडीने सोडविण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली. जोरदार पावसाला सुरूवात होण्यापूर्वी ही कामे युद्धपातळीवर करण्याची सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना शहराध्यक्ष  शंकर जगताप यांनी केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button