ताज्या घडामोडी
खासदार अमोल कोल्हे यांचे भोसरी विधानसभेसाठी योगदान काय ?

नैतिकतेने त्यांना मत मागण्याचा अधिकार राहिला नाही……..सुनील पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष संघटक
शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर लोकसभेचा शहरी भाग म्हणून भोसरी आणि हडपसर विधानसभा येतात, भोसरी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत तर हडपसर पुणे महानगर पालिकेत येते. दोन्ही विधानसभा मिळून ११ लाखाच्या आसपास मतदान आहे.
खासदार अमोल कोल्हे भोसरी विधानसभेतून मतदान मिळावे यासाठी, अमोल कोल्हे यांनी भोसरी विधासभेत गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत, परंतु मागील पाच वर्षात गायब असणारे अमोल कोल्हे भोसरी विधासभेच्या गल्ली बोळात दिसू लागले आहेत, मागील पंचवार्षिक मध्ये भोसरी विधानसभेत त्यांनी किती नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या, किती नागरिकांचे प्रश्न सोडविले, याचे उत्तर अमोल कोल्हे यांनी द्यावे.
छाती बडवून संसदेत प्रश्न मांडणारे अमोल कोल्हे यांना तळवडे रुपीनगर मधील रेड झोन चा प्रश्न महत्वाचा वाटला नाही का ? भोसरी विधासभेत अनेक विकास कामे पालिकेच्या वतीने झाली आणि सुरु आहेत, याची माहिती त्यांनी कधी घेतली का ? अमोल कोल्हे यांनी मागील पाच वर्षाचा स्वतःच्या कामाचा लेख जोखा आरश्यात पहिला असता तर त्यांना स्वतःची कीव वाटली असती, लाखो नागरिकांनी आपल्याला मतदान करून निवडून दिले आहे, त्यांचा विश्वास कसा तोडावा याचा विचार त्यांच्या मनात आला असता.
अमोल कोल्हे यांनी नैतिकता म्ह्णून २०२४ ला घरी बसने गरजेचे होते, पुन्हा एकदा अभिनयाच्या जोरावर निवडून येऊ या खोट्या अपेक्षा भंगाने अमोल कोल्हे उभे राहिले आहेत, परंतु जनता सुज्ञ आहे, निवडणुकी पुरते मतदार राजाला माय बाप म्हणणाऱ्या अमोल कोल्हेना मतदार घरी बसविल्या शिवाय राहणार नाही.
अमोल कोल्हे अभिनय सम्राट आहेत, बोलण्यात पटाईत असल्याने नागरिकांना भुलविण्याचे काम अमोल कोल्हे करत आहेत, त्यांनी भोसरी विधानसभेत काय योगदान दिले, किती कामे त्यांनी इथे केली, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांना निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार देखील नाही, परंतु आपल्या कडे लोकशाही आहे, प्रत्येकाला मत देण्याचा आणि निवडणुका लढण्याचा अधिकार आहे, तरीही अमोल कोल्हे यांना जनता घरी बसविल्या शिवाय राहणार नाही हे त्रिकाल सत्य आहे…..सुनील पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष संघटक













