ताज्या घडामोडीपिंपरी

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित स्मारकाच्या कामात दिरंगाई बद्दल “निषेध धरणे आंदोलन”

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या नियोजित स्मारकाच्या कामात दिरंगाई बद्दल
“निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विशाल जाधव
ओबीसी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे प्रसिद्धी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा क्रांतीसुर्य जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक संदर्भात कुठल्याही प्रकारचा जबाबदारी घेत नसल्याचे आढळून आल्यामुळे एक एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय पिंपरी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकालगत च्या जागेत क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा व तसेच त्यांच्या जीवनावर आधारित न्यूरल्स बसून आकर्षित फुले सृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. शहराच्या नाव लौकिकात भर घालणारे स्मारकाचे काम सन २०२१ पासून सुरू आहे. सदर कामात वेळोवेळी बैठक आयोजित करून सुद्धा संबंधित अधिकारी व ठेकेदार कामाला वेग देत नाही. सदर काम संततीने सुरू असून कामाची मदत संपुष्टात आले असताना पूर्णत्वास गेलेली नाही. शिवाय सदर कामाचा दर्जा देखील निकृष्ट स्वरूपाचा दिसून येत आहे. महामानवाचे स्मारक उभारताना त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ते दर्जेदार स्वरूपाचे उभारणे आवश्यक आहे. महापालिकेकडून चांगली सृष्टी उभारली जात असताना त्यामध्ये दिवंगाई होणे व त्यांचा दर्जा घसरणे योग्य नाही. तसेच सदर ठिकाणी पूर्ण वेळ सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला असून सुद्धा त्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक दिसत नाही. शिवाय या परिसरात कचरा जमा झाला असून तेथे मद्यपान करणाऱ्या घटना देखील घडत असल्याने त्या परिसराचे पवित्र नष्ट होत आहे.

तरी स्मारकाच्या कामकाजाबाबत आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांच्या समवेत आपल्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन कामाचे सद्यस्थिती जाणून घेऊन काम पूर्णत्वास कसे जाईल याबाबत आपल्या स्तरावर संबंधितांना आदेश देण्यात यावे सदर बैठकीस ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी संघर्ष समिती आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीस बोलवण्यात येऊन त्यांच्या समोर आढावा घेण्यात यावा.
ही बैठक ८ दिवसाच्या आत आयोजित करण्यात यावी व ११ एप्रिल २०२५ च्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती दिनी फुले सृष्टीचे भव्य स्वरूपात उद्घाटन करण्यात यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button