ताज्या घडामोडीपिंपरी

कुदळवाडीत भंगार व्यावसायीकाकडून जीएसटी बुडवण्याचा गोरखधंदा, मोठे रॅकेट-टोळी कार्यान्वीत

Spread the love

 

*दरवर्षी 1 हजार कोटी रुपयाच्या टॅक्सची केली जाते चोरी, GST विभागाच्या कार्यपध्दतीवर शंका*

*बनावट कंपन्या उभा करुन GST बुडवण्याचा राजे रोस रहमानी खेळ सुरु*

*अनेक भंगार व्यावसायीकांचा यात समावेश*

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी येथे काही वर्षापासून GST वाचवण्यासाठी वेगवेगळे हातकंडे वापरून, भंगाराच्या बोगस कंपन्या उभ्या करुन हजारो कोटी रुपयाची टॅक्सची चोरी करणारे मोटे रॅकेट सक्रीय असून त्यांच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक उत्पन्नावर डल्ला मारण्याचे काम राजेरोसपणे केले जात आहे. तर यातुन अनेक उद्योजकांची देखील फसवणुक केली जात आहे. असे असले तरी पुण्यातील GST विभागातील काही अधिकारी या रॅकेट मध्ये सहभागी असल्याने या रॅकेटमध्ये वाढ होत असल्याचे शिव श्रमिक मजदूर संघटनेचे सरचिटणीस व माहिती अधिकार कार्यकर्ते गोपाल कच्छवे यांनी आरोप केला असून भंगार व्यावसायिकांच्या व्यवहाराची कसून चौकशी करण्याची मागणी जीएसटी विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवेंद्र नागवेंकर यांच्याकडे केली आहे.यामुळे शहरातील उदयोग वर्तुळात मोठी खळबळ माजली असून या बाबतची तक्रार दिल्ली कार्यालया पर्यंत देखील गेली आहे. यामुळे या प्रकरणाला पुढे कसे वळण मिळते आहे, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

अशा पध्दतीने केली जाते फसवणूकः-
अनंकांच्या नावे बोगस कागदपत्रांच्या आधारे परस्पर अनेक बनावट कंपन्या चालु करुन बिल विक्री करणे, हावाला मार्फत पैसे देवाण घेवाण करणे, नव-नविन बॅंक खाते वापरणे, मनी ट्रान्सफर मार्फत हवाला आणणे या माध्यमातून जीएसटी ची चोरी केली जाते. यासाठी स्क्रॅप, प्लॅस्टिक, स्टिल,रिअल इस्टेट, मधील व्यावसायिकांना बनावट कंपनीची जीएसटीची बिले दिली जातात. अस्तित्वात नसलेल्या कंपन्याच्या बनावट देयकांच्या मदतीने खरेदी विक्रीचे खोटे व्यवहार कागदोपत्री उभे करुन त्याचे आपआपसात चक्रीय पध्दतीचे व्यवहार दाखवतात आणि त्या आधारे GST इनपुट क्रेडीट मिळवून वर्षाला हजारो कोटीची कर चोरी केली जाते. नंतर अधिकारी वर्गाच्या मदतीने उभ्या केलेल्या बनावट कंपन्या बंद करुन या प्रकरणातून सही सलामत सुटतात.

रॅकेट मध्ये यांचा समावेशाचा कच्छवेंचा आरोप ?
अनेक वर्षापासून कुदळवाडी परिसरात एम.डी.कैश रहमानी नामक व्यक्तीकडून बनावट GST चोरीचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप शिव श्रमिक मजुदर संघटनेचे सरचिटणीस गोपल कच्छवे यांनी केला आहे. रहमानी हा “आशिया स्टील ट्रेडर्स या कंपनीचा मालक असून या कंपनीच्या शेकडो कोटी रुपयाच्या GSTघोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी आहे. कैश रहिमान व त्याचे परप्रांतिय साथिदार गरीब लोक, मित्र, नातेवाईक यांना पैशाचे अमिश दाखवून त्यांच्या नावावर अनेक कंपन्या चालवतात. व या कंपन्यामार्फत ही सर्व टॅक्स चोरी केली जाते. यामध्ये सबंधित विभागातील काही अधिकारी देखील सामिल असल्यामुळे यावर कोणत्याच प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्यामुळे अनेक व्यापारी यांचे ग्राहक बनत असून सरकारचा कोट्यावधी रुपयाचा कर चुकविला जात आहे. या सर्व प्रकरणात रहमानी यांचे नातेवाईक मोहम्मद अहमद उर्फ आदिल रहमानी (कशफ ट्रेडींग कंपनी), आरिफ रहीमानी, राजेश सवाराम चौधरी,(आंबिका आर.एस एंटरप्रायसेस), अली रहिमानी, मनव्वर अजीज चौधरी यांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. यातील अनेक व्यक्तिवर या पुर्वीही टॅक्स चोरी प्रकराणा बाबत गुन्हे दाखल आहेत. असेही कच्छवे यांच्याकडून सांगण्यात आले. वरील सबंधित व्यक्ति व व्यवसायिकांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

अहवाला मार्फत अनेक बॅकेच्या खात्यावर झाले वर्षभरात सातशे कोटी रुपयाच्या वर व्यहार

या रॅकेट मध्ये अनेक परप्रांतिय महाराष्ट्रातील व उत्तर प्रदेशातील भंगार व्यावसायिकांचा मोठा समावेश,

GST विभागातील काही अधिकाऱ्यांचा देखील या रॅकेट मध्ये सहभाग, म्हणूनच अनेक वर्षापासून हे रॅकेट शहरात कार्यरत.
—–
कुदळवाडी मधील अनेक व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराची कसुन चौकशी केल्यास अनेक प्रकरणे होतील उघडकीस.

अनेक सहभागी व्यक्तिवर यापुर्वीही कर चोरीचे गुन्हे दाखल तरी देखील GST विभागाची या प्रकरणाकडे डोळेझाक संशयास्पद.

हजारो GST टॅक्स चोरी प्रकरणा बाबत विभागाने कडक कारवाई केली तर अनेक व्यापारी व शासकीय मासे देखील गळाला लागतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button