ताज्या घडामोडीपिंपरी

किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने घरांची तपासणी मोहीम तीव्र, १ लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्यावसायिक आस्थापना, गृह सोसायट्यांसह  घरांची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून डासोत्पत्ती ठिकाणे आढळल्यामुळे आज  दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे १ लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी दिली.

शहरात किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी तपासणी मोहिम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येणारी तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून डासोत्पत्तीची  ठिकाणे आढळलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आज केलेल्या तपासणी मोहिमेत अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २०  हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ६४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १२  हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १९  हजार रुपये दंड वसूल करण्यात आला
आहे.
इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४  हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४३  हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १  हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.  आज नागरिकांवर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  १ जूनपासून आत्तापर्यंत एकूण सुमारे २४ लाखांपेक्षा अधिक दंड या मोहिमेच्या माध्यमातुन वसूल करण्यात आला आहे असल्याचे सहाय्यक आयुक्त येळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button