कासारवाडी येथील महर्षि आनंद सेवा प्रतिष्ठानच्या नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये १०७ जणांची मोफत नेत्र तपासणी आणि ९० जणांना चष्मे वाटप

कासारवाडी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील जैन स्थानकामध्ये महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान आणि जैन श्रावक संघ कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ अशोककुमार पगारिया यांच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस, डॉ अशोककुमार पगारिया, रमणलाल कर्नावट , विलास कुमार पगारिया ,विशाल फुलफगर, संदीप कर्नावट आदीच्या उपस्थितीत करण्यात आला.
सदर शिबिरामध्ये १०७ जणांची नेत्र तपासणी डॉ. एस. एस. पारख यांनी केली. त्या पैकी ९० जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या ७ वर्षात एकुण ३००० पेक्षा जास्त जणांची मोफत नेत्र चिकित्सा करण्यात आली आहे आणि २००० पेक्षा जास्त लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहे. अनेक जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात आली अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप फुलफगर आणि सचिव प्रणीत बागमार यांनी दिली.













