ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी

कामगार तथा शिवसेना नेते इरफान सय्यद यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

Spread the love

 

”आमचा मान, आमची शान, आमचा स्वाभिमान; आमचा भाई इरफान”..
म्हणत शिवसैनिक , हितचिंतक यांची प्रेमाची हाक …

भोसरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कामगार तथा शिवसेना नेते इरफानभाई सय्यद यांचा वाढदिवस विविध विधायक उपक्रमांनी साजरा झाला. दरम्यान वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर यांना भेटून आशीर्वाद घेतले तर राज्यमंत्रीमंडळातील विविध खात्याचे मंत्री, शिवसेना नेते, उपनेते, राजकीय नेते यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यमुनानगर येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळचे खा. श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे सदस्य अमित गोरखे, तुषार हिंगे, प्रवीण भालेकर, रवींद्र सोनवणे, प्रसाद शेट्टी, सीमा साळवे , शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर , राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष अजित गव्हाणे नगरसेवक राहुल भोसले, पंकज भालेकर, भाजपचे विजय फुगे , शाम लांडे,भोसरी विधानसभा प्रमुख संभाजी शिरसाठ, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर , युवा सेनेचे रुपेश कदम , उद्योजक रमेश चौधरी, विजय फुगे, धनंजय भालेकर रिपाईचे बाळासाहेब भागवत , युवानेते सिद्धार्थ बनसोडे , उद्योजक, प्रदीप धामणकर, रवी गोडेकर, प्रमोद शेलार, संतोष साळुंखे, किशोर जैद, रॉकी अगरवाल, दीपक जाधव, महेंद्र ठाकूर, संजय सोलंकी, दिलीप, सोळंकी, युवा नेते , निलेश बोराटे संदीप रासकर, संदीप मधुरे, डॉ. प्रताप सोमवंशी, महेश शेटे युवा नेते, अतिश बारणे, ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे , आझाद मुलानी, ऍडव्होकेट रणदिवे सर, रिक्षा संघटनेचे बाबासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर , संतोष तापकीर , श्री, बनसोडे, महायुती तसेच महाविकास आघाडीतील नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, माथाडी, बांधकाम कामगार, मित्र परिवार आदींनी स्नेहमेळाव्यास उपस्थिती दर्शवून इरफानभाईंवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

शहरातील गरीब, गरजू रुग्णांच्या मदतीसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण मा. खा. शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जनसेवेचा खरा वसा इरफानभाई यांनी घेतला आहे, असे दिसते. दरवर्षी वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकहिताचे उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे कार्यकर्ते करत असतात. तसेच मोठा जनसंपर्क व मित्र परिवार असणारा हा सर्वसमावेशक असा नेता आहे, असे ते म्हणाले.

गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी चिंचवडनगरी ही कामगारनगरी आहे. या नगरीत माथाडी कामगार, इतर कामगारांचे प्रतिनिधित्व इरफानभाई शिवसेना नेते म्हणून करत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. कामगारांच्या मागण्यांना तुम्ही न्याय मिळवून देता, ही गर्दी त्याचीच साक्ष आहे, असे गौरवोद्गार खा. बारणे यांनी यावेळी काढले.

दरम्यान भोसरी मतदार संघात विविध उपक्रमांचे आयोजन करून कामगार नेते इरफान सय्यद यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणेच यंदाही वृत्तपत्रविक्रेत्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पिंपरी चिंचवड शहर, इरफानभाई सय्यद युवा मंच, साद सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र मजदुर संघटना यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button