ताज्या घडामोडीपिंपरी

कन्या विद्यालयात सेवा पूर्ती व सत्कार समारंभ संपन्न

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे यांच्या सेवापूर्ती व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आज शनिवार दिनांक 13/04/2024 रोजी आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

या कार्यक्रमासाठी  हनुमंत नेवाळे साहेब – ( स्कूल कमिटी सदस्य )हे अध्यक्ष म्हणून लाभले. प्रमुख अतिथी म्हणून  विलास महाडिक – (माजी सहसचिव रयत शिक्षण संस्था  महादेव सगरे – ( सहकार्यवाह भारती विद्यापीठ पुणे) ,  किसन रत्नपारखी साहेब (विभागीय अधिकारी पश्चिम विभाग रयत शिक्षण संस्था), मा श्री शंकर पवार साहेब (सहायक विभागीय अधिकारी पश्चिम विभाग रयत शिक्षण संस्था), भाऊसाहेब वाघेरे ( चेअरमन , स्थानिक सल्लागार समिती) ,  डॉ . शशिकांत चव्हाण ( सहसचिव , महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य ),  . शरद गावडे ( विभागीय अधिकारी ,उत्तर विभाग अहमदनगर), प्राचार्य (प्रभारी,)  माधव सरोदे, (प्रभारी प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय), मा प्राचार्य श्री दत्तात्रय गाढवे ( नवमहाराष्ट्र विद्यालय ज्यू. कॉलेज ) इत्यादी अतिथीगण कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका  उर्मिला पाटील यांनी सौ शेटे  यांनी केलेले शैक्षणिक, सामाजिक कार्य व साकारलेले शालेय उपक्रम व त्यांनी जीवन प्रवासात जोडलेली माणसं याविषयी मनोगत व्यक्त केले.

यानंतर सर्व अतिथी गणांचा – संत तुकाराम यांची अभंग गाथा हा ग्रंथ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.व यानंतर रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग औंध पुणे यांचे वतीने लक्ष्मीबाई यांची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध संस्था, रयत बँक औंध पुणे , विविध शाळांचे मुख्याध्यापक, आप्तेष्ट यांचे वतीने श्री व सौ शेटे मॅडम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यानंतर विद्यार्थिनी मनोगत व्यक्त करताना कु सिद्धी खराडे हिने आदर्श शिक्षिका ते उत्कृष्ठ मुख्याध्यापिका हा प्रवास शब्द सुमनातून उलगडला. व पुढे शिक्षक मनोगत व्यक्त करताना सौ अनघा रांगणेकर ,व  प्रवीण राशीनकर यांनी सदैव प्रसन्न , हसतमुख व सकारात्मक विचारधारा असणाऱ्या  मुख्याध्यापिका शारदा शेटे  यांनी विद्यार्थिनी हिताचा विचार करून राबविलेले विविध उपक्रम, शालेय भौतिक सुविधांसाठी समाज माध्यमातून मिळविलेल्या देणग्या याविषयी माहिती दिली.
यानंतर विविध मनोगतांमध्ये शारदा शेटे  यांचे चिरंजीव अभिषेक याने ऑन लाईन शुभेच्छा व्यक्त केल्या व पुढे श्री शंकर शेटे यांनी आपल्या सहजीवनाचा प्रवास मनोगतातून व्यक्त केला. यानंतर ,  शारदा शेटे यांच्या कन्या  अमृता, अश्विनी तसेच बंधू  संजय ठिगळे व  राजेश ठिगळे यांनी नात्यातील भावबंध मनोगतातून व्यक्त केले. यानंतर  शशिकांत चव्हाण , झगडे मॅडम यांनी एक उत्तम शिक्षिका व मुख्याध्यापिका यांच्या स्वभावाचे विविध पैलू उलगडले.

यानंतर रयत शिक्षण संस्था पश्चिम विभागाचे सहायक विभागीय अधिकारी  शंकर पवार  यांनी  शारदा शेटे मॅडम यांनी 34 वर्षाचा सेवाकाल पार पाडत असताना केलेली विविध शैक्षणिक, सामाजिक कामे व मिळविलेल्या देणग्या व ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत घडविलेल्या पिढ्या याविषयी मनोगत व्यक्त केले.

यानंतर भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह महादेव सगरे  यांनी विविध कथा व उदाहरणातून  शारदा शेटे यांचा जीवन प्रवास उलगडला.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विलास महाडिक साहेब यांनी देखील सौ शारदा शेटे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखा व त्यामध्ये अतिशय उत्सफूर्तपणे केलेले शैक्षणिक कार्य व ज्ञानदानाचे पवित्र कार्य व घडविलेले विद्यार्थी याविषयी मनोगत व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती व विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका  शारदा शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना – बालपणापासून ते सेवापुर्ती पर्यंत जोडलेली माणसं, नात्यातील सुसंवाद, सेवेच्या काळात केलेले ज्ञानदानाचे पवित्र कार्य, घडविलेली कुटुंब व्यवस्था व सतत कार्यमग्न व सकारात्मक राहून केलेले कार्य याविषयी ची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हनुमंत नेवाळे साहेब यांनी मा. मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे मॅडम यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करून भावी निरामय दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या .
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका  उर्मिला पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.व सर्व अध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षिका सौ मीनल साकोरे व  रंजना धामणे यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार उपशिक्षिका  शुभांगी दोरगे यांनी व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button