ताज्या घडामोडीपिंपरी
औटी ग्रुपचे संचालक गजानन डुबल यांना अमेरिका युनिर्व्हसिटीची पीएचडी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बांधकाम क्षेत्रातील नामांकित असे नाव असलेले पुण्यातील औटी ग्रुपमध्ये सेल्स अॅण्ड मार्केटिंग संचालक गजानन डुबल यांना अमेरिकेतील (युएसए) दी अमेरिकन युनिर्व्हसिटीकडून बहुप्रतिष्ठीत अशी पीएचडी पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यांनी रिअल इस्टेट बिझनेस अॅण्ड मार्केटिंग या विषयात ही पदवी मिळविली आहे.
गजानन डुबल यांना एम्पावर एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने भारत निर्माण योगदान अॅवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देशातील मान्यवरांना हा अॅवार्ड प्रदान करण्यात येतो. ते रिअर इस्टेट आणि बांधकाम क्षेत्र तसेच, यशस्वी उद्योजक, कॅरिअर मार्गदर्शन या विषयावरील वक्ते ही आहेत. ते रावेत येथील रहिवाशी आहेत. पीएचडी पदवी मिळाल्याने डुबल यांच्यावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.













