एस. बी.पाटील पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे डेव्हिड प्रकाश आणि मीना डेव्हिड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांना शाळेच्या बँड पथकाने सलामी दिली. सूत्रसंचालन विदर्ष त्रिपाठी आणि अंशरा खान यांनी केले. पाचवीतील विद्यार्थिनी राजवी रविशंकर हिने इंग्रजीतून, आठवीतील गौरी खोडके हिने मराठीतून आणि आर्यन भोगे याने हिंदीतून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर नृत्य आणि दांडपट्टा, तलवारबाजी या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले.
मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी म्हणाल्या की, एकविसाव्या शतकात विकसित भारत देश सुसंस्कृत, वैभवशाली, शक्तिशाली घडविण्यासाठी पीसीईटी कटिबद्ध आहे. उपमुख्याध्यापिका पद्मा बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.













