‘एमआयटी एडीटी’च्या प्रांजलीची सुवर्णकामगिरी!

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)न- एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या स्कुल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थीनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने जेजेटीयू विद्यापीठ झुंझनू, राजस्थान येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित दैदिप्यमान कामगिरीची नोंद केली आहे.
प्रांजलीने महिला एकेरी स्पर्धेत स्ट्रोक प्रकाराच्या अंतिम फेरीत ४८ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविताना सोनेरी कामगिरी केली तर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या खेळाडूने ५५ गुणांसह दुसरा क्रमांक पटाकाविला. या स्पर्धेत प्रांजलीला सुवर्णपदकासह सर्वोत्कृत महिला खेळाडू पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. प्रांजली ही एमआयटी एडीटी विद्यापीठाची अत्यंत हुरहुन्नरी खेळाडू असून तिने काही महिन्यांपूर्वीच ३७ व्या राष्ट्रीय मिनीगोल्फ स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना रौप्य पदक देखील पटकाविले होते.
प्रांजलीच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मोहित दुबे, डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.पद्माकर फड यांनी तिचे अभिनंदन केले आहे.














