Spread the love

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 8 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, कोल्हापूर, शिर्डी, बुलढाणा, हिंगोली, रामटेक, हातकणंगले आणि मावळ या मतदारसंघाचा समावेश आहे. महायुतीमध्ये अद्यापही काही मतदारसंघावरुन धुसफूस सुरु असताना शिंदे गटाकडून ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ज्या जागांवरुन वाद आहे त्यांचा समावेश टाळला आहे.

शिंदे गटाने दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने आणि मावळमधून श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर – संजय मंडलिक
शिर्डी – सदाशिव लोखंडे
बुलढाणा – प्रतापराव जाधव
हिंगोली – हेमंत पाटील
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने
मावळ – श्रीरंग आप्पा बारणे

 

Share.
Leave A Reply

Exit mobile version