ताज्या घडामोडीपिंपरी

उद्योग मंत्री उदय सामंत यांचा शनिवारी चिंचवड दौरा शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाची आढावा बैठक

Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात ऐतिहासिक शंभरावे मराठी नाट्यसंमेलन जानेवारी महिन्यात होणार आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत शनिवारी (दि.२३) दुपारी १:३० वाजता चिंचवड मध्ये येणार आहेत अशी माहिती मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते चिंचवडगाव, केशवनगर येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे होणार आहे. उदय सामंत हे याठिकाणी पाहणी करण्यासाठी दुपारी २ वाजता भेट देणार आहेत.

या संमेलना निमित्त भोईर नगर, कामगार कल्याण मैदान येथे बालनगरी मंडप उभारण्यात येणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे या ठिकाणी पाहणी करतील आणि त्यांच्या उपस्थितीत दुपारी १:४५ वाजता येथे मंडप पूजन करण्यात येणार आहे. यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील कलावंत तसेच संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या प्रतिनिधींबरोबर भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी
संवाद साधून आढावा बैठक होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button