ताज्या घडामोडीपिंपरी

आळंदी देवाची येथे हिमालयीन समर्पण ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन

श्री क्षेत्र आळंदी मध्ये होणाऱ्या निःशुल्क ध्यानयोग शिबिरामध्ये जिवंत सद्गुरूंच्या सानिध्यात आत्मानंद प्राप्त करण्याचा सुवर्ण योग!

Spread the love

आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिमालयीन समर्पण ध्यान महाशिबिराचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत मुंबई मराठा फ्रुटवाला धर्मशाळा ग्राउंड, आळंदी देवाची येथे होणार आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये वाढलेला तणाव, दुःख आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी बाह्य उपायांचा शोध यातच मनुष्य अडकला आहे. परंतु, दुःख दूर करण्याचा उपाय बाहेर नसून आपल्या आतच आहे.
व्यक्तिने आपल्या जीवनात ध्यान जोडल्यास तो शांती प्राप्त करू शकतो आणि यातूनच शांतिमय विश्वाची निर्मिती केली जाऊ शकते. ध्यानयोग केल्याने शरीरभाव कमी होऊन आत्मभाव वाढण्यास मदत होते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात शांती आणि आत्मसाक्षात्काराच्या शोधात असलेले असंख्य साधक ‘हिमालयीन समर्पण ध्यानयोग’ च्या मार्गाने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या आत्मधर्माची, विश्वधर्माची आणि ध्यानाची प्रत्यक्ष अनुभूती या निःशुल्क शिबिरामध्ये आपल्याला जिवंत सद्गुरूंच्या सानिध्यात प्राप्त होऊ शकते.

सद्‌गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजी एक आत्मसाक्षात्कारी ऋषी आहेत ज्यांनी १६ वर्षे हिमालयात ध्यान साधना करून अनेक कैवल्य कुंभक योगी , जैन मुनी आणि हिमालयीन गुरूं कडून दिव्य आत्मज्ञान आत्मसात केले. हिमालयातील हा अनुभूती प्रधान, अमूल्य ८०० वर्ष जुना समर्पण ध्यानयोग संस्कार भारतासहित जगातील ७२ देशातील लोकांनी आपलासा केला आहे .

श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मानुभूती बाबत, विश्वधर्म, आत्मधर्म बाबत जे सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सुयोग या अद्वितीय तीन दिवसीय निःशुल्क हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिराच्या माध्यमातून घडणार आहे.

शिवाय शिविराच्या निमित्ताने, शिविरस्थळीच एक विशेष प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे- आळंदी ते आळंदी (गुरु अनेक गुरु तत्व एक)

प्रदर्शनीची मुख्य आकर्षणं:

•संत ज्ञानेश्वर महाराज व परम पूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक विषयांचे सुंदर समन्वय व सचित्र सादरीकरण

•परम पूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या हिमालयातील आध्यात्मिक प्रवासाची झलक

•वेळ: सकाळी ८.०० वाजल्यापासून सुरू

या महाशिबिराचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button