ताज्या घडामोडीपिंपरी

आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या ४८ तासात सार्वजनिक मालमत्तेवरील २५ हजाराहून अधिक प्रचारसाहित्य हटविले-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Spread the love

 

पुणे,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर पहिल्या ४८ तासात सर्व मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक मालमत्ता व त्यांच्या आवारातील जाहिरात फलके, भित्तीपत्रके, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज आदी एकूण २५ हजार ८६० प्रचारसाहित्य तात्काळ प्रभावाने हटविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

जुन्नर विधानसभा मतदासंघात १ हजार ३९७, आंबेगाव १ हजार २९०, खेड आळंदी १ हजार १८६, शिरूर १ हजार २३१, दौंड १ हजार ३१५, इंदापूर १ हजार ५६९, बारामती ८५६, पुरंदर २ हजार ८७, भोर १ हजार ३४५, मावळ ३५६, चिंचवड ४ हजार ६६२, पिंपरी ४२५, वडगाव शेरी ४१, भोसरी ६ हजार ३२९, शिवाजीनगर ३७८, कोथरुड २२४, खडकवासला ४९१, पर्वती २९६, हडपसर २१०, पुणे कॅन्टोन्मेंट १४९, कसबा पेठ मतदार संघात ७७ असे फलके, होर्डिंग्ज, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज असे सार्वजनिक मालमत्तेवरील एकूण २५ हजार ८६० प्रचारसाहित्य हटविण्यात आले आहेत.

हटविण्यात आलेल्या प्रचारसाहित्यात भित्तीवरील लिखान १ हजार ९१९, भित्तीपत्रके ७ हजार २९२, जाहिरात फलके २ हजार ११७, बॅनर्स ४ हजार ५८०, ध्वज २ हजार ८५४ आणि इतर साहित्य ७ हजार ९८ यांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. दिवसे यांनी दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button