अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त चिंचवडच्या मुलींचे मोरया गोसावी समोर भरत नाट्यम सादरीकरण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कलाश्री नृत्यशाळा,चिंचवडमधील स्थानिक कलाश्री नृत्यशाळा संस्थेच्या असावरी मधुकर बच्चे,व तन्वी राजू कोरे या मुलींनी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरात अयोध्येतील श्रीरामाला भरत नाट्यम सादर करून वंदन केले.
याबाबत त्यांचे पालक मधुकर बच्चे व राजू कोरे यांनी सांगितले की,आमच्या मुलींनी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहोळ्या निमित्त प्रभू श्रीरामाला वंदन करायचे आहे,त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही या दोघींना मोरया गोसावी मंदिर परिसरात दृक्श्राव माध्यमातून नृत्य सादर करा,आपण लहान वयात अयोध्येला तुम्हा दोघीना घेऊन जाऊ शकत नाही.
त्यांनी अनोख्या पद्धतीने मोरया गोसावी मंदिरात राम वंदना सादर केली.या मुलींनी 100 व्या पिंपरी चिंचवड येथील मराठी साहित्य संमेलनामध्ये अप्रतिम गणेश स्तवन सादर केले होते. त्याचे संपूर्ण शहरात कौतुक झाले होते.













