Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) —मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने वुई टुगेदर फाउंडेशन आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर ईशा नेत्रालय हॉस्पिटल, चिंचवड येथे पार पडले.

शिबिरात १५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक मशिनद्वारे नागरिकांची नेत्र तपासणी केली. तसेच सर्जन डॉ. वैभव अवताडे (रेटिना व मोतीबिंदू स्पेशालिस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यांचे आजार, त्यांची काळजी आणि वर्षातून एकदा नेत्र तपासणी का आवश्यक आहे यावर उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित नागरिकांच्या शंकांचेही त्यांनी समाधान केले.

या शिबिराला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड व वर्क कोऑर्डिनेटर गणेश कांबळे यांनी हॉस्पिटलच्या सेवा व उपचार पद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, रवींद्र सागडे, सलीम सय्यद, रवींद्र काळे, अर्जुन पाटोळे, सुरेंद्र जगताप, सदाशिव गुरव, रोहिणी बच्चे, वासंती काळे, दिलीप दानी, विलास गटने आणि पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

शिबिरामध्ये डॉ. वैभव अवताडे (रेटिना, मोतीबिंदू), डॉ. जयशील नाझरे (मोतीबिंदू, काचबिंदू, लहान मुलांचे स्पेशालिस्ट व रिफ्रॅक्टिव सर्जन), गणेश कांबळे (मार्केटिंग हेड), दुर्वाक्षी (ॲडमिन) आणि शिवानी शिंदे (फ्लोअर मॅनेजर) यांनी परिश्रम घेऊन नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version