ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग २६ मध्ये सौ. सारिका गणेश कास्पटे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्कर्ष चौक ते राधाकृष्ण कॉलनीपर्यंत ‘तुतारी’ला भरघोस पाठिंबा

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवार सौ. सारिका गणेश कास्पटे यांच्या प्रचाराला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उत्कर्ष चौक, जानोबा चौक, कळाटे कॉलनी, साईनाथ कॉलनी, नंदवन कॉलनी आणि राधाकृष्ण कॉलनी या भागांमध्ये करण्यात आलेल्या प्रचारादरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ठिकठिकाणी स्थानिक रहिवाशांनी प्रचार पथकाचे स्वागत करत सौ. सारिका कास्पटे यांच्याशी थेट संवाद साधला.

या प्रचारात विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व महिलांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. “आमच्या भागातील प्रश्न सातत्याने सोडवणारे नेतृत्व हवे आहे,” अशी भूमिका अनेक नागरिकांनी मांडत सौ. सारिका गणेश कास्पटे यांना पाठिंबा दर्शवला.

नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता, प्रभाग क्रमांक २६ मध्ये ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निवडणूक चिन्हाला विशेष पाठिंबा मिळत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक २६ मध्ये निवडणुकीची चुरस अधिकच वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button