ताज्या घडामोडीपिंपरी

शिवस्मारकाच्या लढ्यात भाजप उमेदवार विनोद नढेंचा सिंहाचा वाटा

प्रभाग २२ मधील नीता पाडळे–कोमल काळे-ॲड. हर्षद नढे, पॅनलचा ठाम पाठपुरावा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवस्मारक उभारणीचा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरात केवळ सांस्कृतिक नव्हे तर ठळक राजकीय मुद्दा बनला आहे. या महत्त्वाच्या विषयात भाजपचे उमेदवार विनोद नढे यांनी निर्णायक भूमिका बजावत शिवस्मारकासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाकडे झालेल्या पत्रव्यवहारात आणि प्रस्ताव मांडणीत विनोद नढेंचा सिंहाचा वाटा राहिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपचे उमेदवार विनोद नढे, ॲड. हर्षद नढे, नीता पाडळे आणि कोमल काळे यांनी शिवस्मारक उभारणीसाठी एकसंघ भूमिका घेतली आहे.

शिवस्मारकाच्या लढ्यात भाजप उमेदवार विनोद नढेंचा सिंहाचा वाटा; प्रभाग २२ मधील विनोद नढे–नीता पाडळे–कोमल काळे-ॲड. हर्षद नढे, पॅनलचा ठाम पाठपुरावा

प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपचे उमेदवार विनोद नढे व नीता पाडळे यांनी शिवस्मारक उभारणीसाठी एकसंघ भूमिका घेतली आहे. आणि कोमल काळे यांनी शिवस्मारक उभारणीसाठी एकसंघ भूमिका घेतली आहे.

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील एम.एम. स्कूल चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव या पॅनलच्या पुढाकारातूनच प्रशासनापर्यंत पोहोचला.

या संदर्भात विनोद नढे व नीता पाडळे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग तसेच महापालिकेच्या स्थापत्य विभागाशी सातत्याने समन्वय साधत आवश्यक परवानग्यांसाठी पाठपुरावा केला. काही विभागांकडून मान्यता मिळाली असली तरी, शासकीय नियमांनुसार सर्व विभागांची अंतिम मंजुरी आवश्यक असल्याने प्रस्ताव सध्या प्रशासकीय प्रक्रियेत अडकलेला आहे. मात्र, या अडथळ्यांमागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसून केवळ नियमांचे बंधन असल्याचे भाजप पॅनलकडून स्पष्ट केले जात आहे.

ॲड. हर्षद नढे यांनी कायदेशीर चौकटीत राहून स्मारक उभारणीसाठी मार्ग काढण्यावर भर दिला असून, नीता पाडळे आणि कोमल काळे यांनी स्थानिक नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. प्रभागातील नागरिकांनीही शिवस्मारकाच्या मुद्द्यावर या चौघांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवस्मारकाचा प्रश्न भाजपसाठी प्रभाग २२ मध्ये भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरत असून, विनोद नढे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने या विषयाला निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनवला आहे. आगामी काळात सर्व आवश्यक शासकीय मान्यता मिळवून शिवस्मारक उभारणी प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार या पॅनलने व्यक्त केला आहे.

शिवरायांच्या स्मृती जपण्याचा संकल्प आणि प्रशासनाशी संघर्ष करण्याची तयारी यामुळे प्रभाग २२ मध्ये भाजप पॅनलची भूमिका अधिक ठाम होत असून, शिवस्मारकाचा मुद्दा येत्या निवडणूक प्रचारात निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील एम.एम. स्कूल चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव या पॅनलच्या पुढाकारातूनच प्रशासनापर्यंत पोहोचला.

या संदर्भात विनोद नढे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग तसेच महापालिकेच्या स्थापत्य विभागाशी सातत्याने समन्वय साधत आवश्यक परवानग्यांसाठी पाठपुरावा केला. काही विभागांकडून मान्यता मिळाली असली तरी, शासकीय नियमांनुसार सर्व विभागांची अंतिम मंजुरी आवश्यक असल्याने प्रस्ताव सध्या प्रशासकीय प्रक्रियेत अडकलेला आहे. मात्र, या अडथळ्यांमागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसून केवळ नियमांचे बंधन असल्याचे भाजप पॅनलकडून स्पष्ट केले जात आहे.

ॲड. हर्षद नढे यांनी कायदेशीर चौकटीत राहून स्मारक उभारणीसाठी मार्ग काढण्यावर भर दिला असून, नीता पाडळे आणि कोमल काळे यांनी स्थानिक नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. प्रभागातील नागरिकांनीही शिवस्मारकाच्या मुद्द्यावर या चौघांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवस्मारकाचा प्रश्न भाजपसाठी प्रभाग २२ मध्ये भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरत असून, विनोद नढे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने या विषयाला निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनवला आहे. आगामी काळात सर्व आवश्यक शासकीय मान्यता मिळवून शिवस्मारक उभारणी प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार या पॅनलने व्यक्त केला आहे.

शिवरायांच्या स्मृती जपण्याचा संकल्प आणि प्रशासनाशी संघर्ष करण्याची तयारी यामुळे प्रभाग २२ मध्ये भाजप पॅनलची भूमिका अधिक ठाम होत असून, शिवस्मारकाचा मुद्दा येत्या निवडणूक प्रचारात निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button