Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत निगडी प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुलभा उबाळे यांच्या प्रचाराने वेग घेतला असून “एकच नारा – आपला बाण धनुष्यबाण, आपलं मत धनुष्यबाण” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. प्रचार फेरीदरम्यान धनुष्यबाणाच्या चिन्हाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रभागात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे.

सुलभा उबाळे यांनी प्रभागातील विविध भागांत घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सेवा, महिला सुरक्षितता तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. “निगडी प्रभाग १३ मधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी उपलब्ध राहीन. विकास, पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद हीच माझी ओळख असेल,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रचारादरम्यान महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला. शिवसेनेच्या परंपरागत विचारधारेवर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी सुलभा उबाळे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेतली. धनुष्यबाणाच्या प्रतीकाभोवती एकजूट दाखवत कार्यकर्त्यांनी आक्रमक पण शिस्तबद्ध प्रचार करत वातावरण तापवले.

स्थानिक नागरिकांनीही सुलभा उबाळे यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत “प्रभागात सक्षम, लढाऊ आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहे” अशी भावना व्यक्त केली. संघटित कार्यकर्ते, स्पष्ट भूमिका आणि आक्रमक प्रचारशैली यामुळे निगडी प्रभाग १३ मध्ये शिवसेनेचा प्रचार निर्णायक वळण घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी निवडणुकीत धनुष्यबाणाचा गजर अधिक बुलंद होणार असल्याचे संकेत या प्रचारातून मिळत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version