पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित ठाकरे शिवसेना चषक २०२५ भव्य हाफ पीच क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्रमांक १४ मध्ये संत तुकाराम महाराज पालखी तळ, विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रभाग क्रमांक १४ मधील एकूण ३२ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत ३२ संघांचे सामने उत्साहात पार पडले.
सोमवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी सेमीफायनल व अंतिम सामन्यांचे आयोजन करण्यात आले. अंतिम निकालानुसार प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वाडी बॉईज, दत्तवाडी आकुर्डी संघाने पटकावले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पोलीस लाईन चिंचवड स्टेशन संघाला मिळाले, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शादाब खान स्पोर्ट फाउंडेशन, काळभोर नगर आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक समीर खान स्पोर्ट फाउंडेशन, आकुर्डी संघाने मिळवले.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच पिंपरी विधानसभेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार व उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मनियार यांनी उपस्थिती लावत खेळाडूंना मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण सोहळा माजी नगरसेविका उर्मिला काळभोर, माजी नगरसेविका सविता वायकर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप, शिवसेना नेते युवराज कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते महेश काटे, अजित शितोळे, आयुष निंबाळकर, समीर बागवान, मनीषा शिंदे, पप्पू पठाण आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
यावेळी निखिल दळवी यांच्या कॅलेंडरचे प्रकाशन माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बॉक्सिंग खेळाडू जयदीप रननवरे, कराटे खेळाडू तृप्ती निंबळे व आदर्श शिंदे, तसेच युरो स्कूल आकुर्डीच्या प्रमुख मानसी ननावरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेचे आयोजन निखिल उमाकांत दळवी यांनी केले असून सूत्रसंचालन अजय पवार व किशोर शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना आकुर्डी शाखाप्रमुख गोविंदराव शिंदे यांच्यासह उद्योजक सोमनाथ काळभोर, दीप्ती काळभोर, शिवराज रणनवरे, शादाब खान, प्रतीक जानराव, कृष्णा माने, ऋषिकेश घोरपडे, ऋषिकेश कडव, मयूर पवार, राजेश चौधरी, अण्णा शिंदे, यदनेश वाघमारे, शुभम फुले यांनी केले.
या स्पर्धेमुळे परिसरातील तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळाले असून क्रीडा संस्कृतीला चालना मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

















