विलास मडिगेरी यांचे कार्य संस्कृती व सामाजिक भान जोपासणारे – आमदार शंकर जगताप
वाढदिवसानिमित्त गोषाळेत गोपुजन, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांचा सन्मान. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा

भोसरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षात सर्वांसोबत उभे राहणारे मार्गदर्शक म्हणून विलास मडिगेरी यांची ओळख आहे. वाढदिवस साजरा करताना देखील ते संस्कृती व सामाजिक भान जोपासता. वर्षभर त्यांच्याकडून अखंड २० वर्षांपासून सातत्याने राबविले जाणारे उपक्रमही वाखागण्याजोगे असतात. समाजकारण, राजकारणात नव्याने काम करू पाहणा-या सर्वांनी त्यांच्याकडून हे शिकले पाहिजे, असे गौरवोद्गार चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी काढले.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांचा वाढदिवस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान शिबीर, वैद्यकीय तपासणी, वृक्षारोपण, आश्रमशाळेत मुलांना अन्नदान अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित राहून विलास मडिगेरी यांना शुभेच्छा देताना आमदार जगताप बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापालिकेचे माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, कामगार नेते सचिन भैय्या लांडगे, विजुषेठ जगताप माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, उद्योजक सोमनाथ काटे, नवीन लायगुडे, माऊली जगताप, संतोष कलाटे, योगेश लांडगे, सदाशिव खाडे शेखर चिंचवडे,शिवराज लांडगे, बाबुराव लोंढे चंद्रकांत देशमुख शिवकुमार अग्रे, यशवंत गुंजाळ नेताजी घारे, यांच्यासह प्रभागातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, बालाजीनगर, खंडेवस्ती, संतनगर बुद्धविहाराचे पदाधिकारी, बीएनएफसी तसेच युवा प्रतिष्ठान, सरकार युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल रक्तपेढी व वायसीएम रुग्णालय रक्तपेढी, तसेच लाईफ लाईन ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये २९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर, संपूर्ण दिवसभरात परिसरातील २५० नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच, मे़डिकव्हर हॉस्पीटलच्या मोफत फॅमिली कार्ड व १०० लोकांचा ईसीजी मोफत काढण्यात आला. इंद्रायणीनगर येथील सेक्टर १ चैतन्य पार्क व प्रभाग क्रमांक ८ मध्ये ठिकठिकाणी १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भोसरीतील पताशीबाई लुंकड अंधशाळा, महापालिका वैष्णोमाता प्राथमिक शाळा, गुळवेवस्ती येथील यशवंतराव चव्हाण आश्रम, चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुल इ. ठिकाणी अन्नदान, शिधा व फळवावाटप करण्यात आले. पांजरपोळ गोशाळेत हिरवा चारा दान करण्यात आला.
भोसरी, इंद्रायणीनगर परिसरातील दहावी, बारावीतील ४३१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी करिअर बदलत्या वाटा आणि संधी या विषयावर डॉ. संतोष मचाले यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी दहावी, बारावीनंतरच्या करियरच्या संधी व भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. श्री साई चौक मित्र मंडळ व श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान, श्री वैष्णोमाता मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, युवा कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आभार धनंजय जाधव यांनी मानले.












