ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी
कुदळवाडीत आषाढी एकादशी निमित्त उपवास फराळ वाटप कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी यादवनगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी हनुमान मंदिर येथे आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी उपवास फराळ वाटप कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि सेवाभावी वातावरणात पार पडला.
स्व. वै. वामन महाराज यादव, कै. नथु खंडु यादव, कै. बबाबाई नथु यादव, कै. सुदाम नथु यादव, कै. गुलाब नथु यादव यांच्या पुण्यस्मरणार्थ
या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन दिनेश यादव आणि सौ निशा यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
हा उपक्रम आमदार पै. महेशदादा लांडगे युवा मंच, ईद्रांयणी महिला प्रतिष्ठान आणि दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
पंढरपूरची वारी मंदिरातच अनुभवली!
जे भाविक प्रत्यक्ष पंढरपूर वारीस जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठीच या मंदिरातच विठ्ठलनामाच्या गजरात, एकात्मतेच्या भावनेत हा कार्यक्रम पार पडला. विठ्ठलाची प्रार्थना, भक्तिमय वातावरण, आणि फराळ वाटप यामुळे पंढरपूरचीच अनुभूती लाभली.
विविध वयोगटांतील उपवास करणाऱ्या महिला, पुरुष व बालकांसाठी स्वादिष्ट फराळाचे वाटप करण्यात आले.
दिनेश यादव आणि निशा यादव
शिस्तबद्ध आयोजन सेवाभावी कार्यकर्त्यांचे सहकार्य
भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
मंदिरातच वारकरी सांप्रदायाचा अनुभव घेतला. हा पवित्र उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि सहभागी भाविकांचे आयोजकांकडून मनःपूर्वक आभार.
यावेळी उपस्थितामध्ये लालचंद यादव,विजयराज यादव,दत्तात्रय हरगुडे, सुरेश वाळुंज, योगेश यादव,आकश किवळे,मनोज मोरे,रामकृष्ण लांडगे, स्वराज पिजंण,विशाल उमाप, गणेश यादव,दिपक घन,रोहित कदम,विकास यादव,सोमनाथ यादव,स्वप्निल पोटघन,बालाजी पांचाळ,आकाश साळुंखे, प्रकाश चौधरी, शंशीकात पुंड,तात्यासाहेब सपकाळ,करण पाखरे हे नागरिक उपस्थित होते













