Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील प्रभाग क्र.२० हा प्रभाग पिंपरी चिंचवडमधील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा मतदार संघ आहे.या प्रभागातून अनेक विविध प्रस्थापित पक्षांकडून अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.परंतू अशा मातब्बर प्रस्थापितांच्या भाऊ गर्दीत या प्रभागातील जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून  वैजयंती संदीप ढेरंगे/राक्षे यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.आतापर्यंत निवडूण आलेल्या प्रस्थापित नगरसेवकांनी प्रभागातला कुठला प्रश्न मार्गी न लावल्यामुळे या मतदार संघातील जनतेला आता बदल हवा आहे.म्हणुन येणा-या महानगर पालिकेच्या निवडणुकीत मतदार संघातील जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून विविध सामाजिक संघटनेकडून सर्वाधिक सौ वैजयंती संदीप ढेरंगे यांना पाठींबा मिळत आहे.त्याच धर्तीवर भारतीय दलित पँथर या सामाजिक संघटनेनेही आपला पाठींबा दर्शविला आहे.या पाठींब्याच्या जोरावरच या उमेदवार बाजी मारतील अशी शहरात जोरदार चर्चा आहे.

प्रभाग क्र.२० मधील वैजयंती ढेरंगे/राक्षे यांना निवडूण आणण्यासाठी प्रभागातील जनतेने सर्व शक्ती निशी मैदानात उतरावे असे अवाहनही भारतीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष राजू सरोदे यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version