महावितरण पुणे झोन अंतर्गत कार्यरत तांत्रिक कामगारांचे तात्काळ प्रश्न सोडवण्यासाठी आमरण उपोषण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विज क्षेत्रात दर्जेदार सेवा देणारी महावितरण कंपनी व महाराष्ट्रातील सर्वाधिक महसूल मिळवून देणारे पुणे झोन अंतर्गत कार्यरत तांत्रिक कर्मचारी यांचे महावितरण प्रशासना कडून ३ ते ४ वर्षापासून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने दीर्घ कालावधी पासून प्रश्न प्रलंबित आहे. सदर प्रलंबित प्रश्न सोडवणे साठी तांत्रिक कामगार युनियन रजि.नं.५०५९ वतीने महावितरण पुणे झोन कार्यालय , रास्तापेठ समोर बुधवार दि. १६ एप्रिल २०२५ लां प्रचंड द्वारसभा घेऊन निषेध व आक्रोश व्यक्त करण्यात आला. तात्काळ दीर्घ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार या द्वारसभेच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र महावितरण प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने मंगळवार २२ एप्रिल २०२५ आमरण उपोषण सुरू करण्यात आले. तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे ,केंद्रीय उपसरचिटणीस शिवाजी शिवनेचारी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.तसेच प्रादेशिक सचिव शरद डगळे, महेश पाटील ,पुणे झोन सचिव विलास निमसटकर ,अध्यक्ष अजित दजगुडे , उपाध्यश धनेश तोडकर, संघटक संतोष खताळ, माजी सचिव श्री.चंद्रशेखर बधे यांनी संबोधित केले. व द्वारसभे प्रमाणे आमरण उपोषण करून प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे बाबत आवाहन केले.
पुणे झोन अंतर्गत कार्यरत तांत्रिक कर्मचारी यांचे वरिष्ठ यंत्रचालक डीम डेट प्रमोशन प्रश्न २०२१ पासून प्रलंबित आहे. सदर विषयी महाराष्ट्र शासन निर्णयांचे व महावितरण परिपत्रक १८० चे उल्लंघन केले गेले. दुसरा प्रश्न – मयत कर्मचारी कै. हणमंत भिसे हे महावितरण सेवेत सरळसेवा भरतीत कंपनी पे रोल वर रुजू झाल्याने व सेवेचे सलग ५ वर्ष अधिक सेवा पूर्ण केल्याने त्याचे मृत्यू पश्चात कुटुंबियांना डेथ ग्रज्युटी रक्कम देण्यात यावी. तिसरा प्रश्न – वाघोली गाव पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात समाविष्ट झाल्याने ईतर शासकीय आस्थापना प्रमाणे वाघोली शाखा अंतर्गत काम करणारे वीज कर्मचारी यांना मेट्रो सिटी नुसार घरभाडे भत्ता व इतर लाभ देण्यात यावे. चौथा प्रश्न – महावितरण सेवेत काम करणारे तंत्रज्ञ, वरिष्ठ – प्रधान तंत्रज्ञ कर्मचारी यांची महावितरण सरळसेवा भरतीत उपकेंद्र सहाय्यक पदी नियुक्ती झाली. त्यांचे कायम कर्मचारी प्रमाणे जुने वेतन , घरभाडे, सर्व भत्ते व अनुषंगिक लाभ संरक्षित करण्यात आले.त्यांना अर्जित रजा देखील देण्यात आल्या. उपभोग घेतलेल्या अर्जित रजा मंजूर करण्यात आल्या.मात्र कर्मचाऱ्यांना कोणतीही सूचना परिपत्रक न काढता तेवढा रजा कालावधी यंत्रचालक समावेशन वेळी वाढवण्यात आला. पुणे झोन सहाय्यक महाव्यवस्थापक यांचे वेळकाढू व आडमुठे धोरणामुळे महावितरण पुणे झोन निगडीत सर्वच प्रश्नां बाबतीत मुख्य कार्यालय कडे मार्गदर्शन मागवण्यात आले. मात्र सदर मार्गदर्शन नावाखाली गेली ३ ते ४ वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे. सतत पाठपुरावा व प्रसंगी आंदोलन करून देखील महावितरण मुख्य कार्यालय प्रकाशगढ प्रशासन कडून मार्गदर्शन दिल्या जात नाही. तसेच पुणे झोन प्रशासन कडून देखील मार्गदर्शन मिळणे साठी पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यां बाबतीत अन्याय होत असल्याने असंतोष वाढला.
महावितरण प्रशासना कडून ३ ते ४ वर्षापासून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने अखेर तांत्रिक कामगार युनियन पुणे झोन तर्फे आमरण उपोषण मार्ग अवलंबावा लागला आहे. महावितरण पुणे झोन व मुख्य कार्यालय प्रशासन प्रकाशगड मुंबई यांनी दिर्घ कालावधी पासून प्रलंबित प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करावी व तांत्रिक कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा.अशी मागणी तांत्रिक कामगार युनियन, पुणे झोन मार्फत करण्यात येत आहे.
“ पुणे झोन प्रशासन व मुख्य कार्यालय प्रशासन यांचे कडे सतत पाठपुरावा करून देखील प्रश्न सुटत नसल्याने कडक उन्हाळ्याच्या दिवसात आमरण उपोषन करण्याची वेळ प्रशासनाने तांत्रिक कर्मचाऱ्यांवर आणली आहे. महावितरण पुणे झोन व मुख्यालय प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रश्न सोडवावे व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.”, तांत्रिक कामगार युनियन (महा.राज्य) पुणे झोन सचिव विलास निमसटकर यांनी सांगितले.









